संशोधन कार्यात नैसर्गिक शेतीला महत्व-कुलगुरु विलास खर्चे
संशोधन कार्यात नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे लागणार - कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज |प्रतिनिथी हरित क्रांतीनंतर हायब्रीड बियाणे व रासायनिक खते आल्यानंतर उत्पादन वाढले असले तरी या काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेणखताचा कमी वापर, सेंद्रीय खताचा जास्त वापर न करणे यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळावे लागत आहे. या पुढील काळात जमिनीच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीला अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान विभागाच्या वतीने निरोगी शहरांसाठी निरोगी माती या संकल्पनेवर आधारित 12 वा जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. जालंदर पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुभाष ढाण...