Posts

Showing posts from January, 2026

सुनेत्रा वहिनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपुख्यमंत्री

Image
 वहिनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री  घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे  नवरा अकस्मात गमावण्याचे अपार दुःख असतानाही सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवऱ्याच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी त्यांनी पदर खोचून पुन्हा सार्वजनिक जबाबदारी स्वीकारली. आयुष्यभर शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, गोरगरीब व कष्टकरी जनतेसाठी कार्य करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार दुर्दैवी विमान अपघातात काळाच्या पडद्याआड गेले. त्या अपघातानंतर घटनास्थळी उडालेली कागदपत्रे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळली जणू संपूर्ण व्यवस्था कोलमडल्याचेच ते प्रतीक होते. कदाचित खासदार सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.  अतिशय  मनावर दगड ठेवून अथवा व्यक्तिगत मत बाजुला ठेवुन सहकाऱ्याच्या आग्रहा खातर सुनेत्रा पवार यांना शपथविधी उरकून घ्यावा लागला   त्यांनी हे पद इतक्या लवकर स्वीकारणे योग्य होते की नाही, याबाबत मतभेद असू शकतात आणि ते स्वाभाविकही आहेत. अजित पवारांचे दशक्रिया विधी अजून झाला नाही. आगोदर “अजित पवारांनंतर काय?”, “राष्ट्रवादी काँग्...

स्वतःचे घर उभे करुन संसार थाटणारा "दादा" आता फक्त आठवणीत

Image
स्वतःचे घर उभे करूनच संसार थाटणारा ‘दादा’… आता फक्त आठवणींत जिवंत राहुरी | घाडगे न्यूज ✍️ शिवाजी घाडगे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले अकाली निधन म्हणजे केवळ एका नेत्याचा अंत नाही; तो लाखो कुटुंबांच्या काळजावर उमटलेला खोल घाव आहे. कणखर निर्णय, रोखठोक शब्द, मिश्किल स्वभाव आणि सर्वसामान्यांशी घट्ट नातं जपणारा हा नेता आज प्रत्यक्षात नाही… उरल्या आहेत त्या केवळ आठवणी, अश्रू आणि न संपणारी हुरहूर. आज ‘दादा’ हे नाव घेताच डोळ्यांसमोर सत्ता, पद, राजकारण उभं राहतं. पण या सगळ्या यशाच्या झगमगाटामागे एक अतिशय साधं, कष्टकरी, मातीशी नाळ जोडलेलं आणि संवेदनशील मन दडलेलं होतं—जे आयुष्यभर आपल्या माणसांना, आपल्या गावाला आणि आपल्या मुळांना विसरलं नाही. दादांचं बालपण देवळाली प्रवऱ्याच्या मातीत घडलं. आजोळचा तो वाडा, मामाकडची शेती-वाडी, एकत्र कुटुंबाची ऊब, पाटपाण्याखालची हिरवीगार बागायत… त्या काळात देवळाली प्रवरा हे परिसरातील समृद्ध, गजबजलेलं आणि बोलकं गाव होतं. राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या वैभवामुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली होती. ऊस फवारणीसाठी उडणारी छोटी हेलिकॉ...

दादा...हा डाव नियतीने जिंकून नेला राव

Image
दादा… हा डाव नियतीने जिंकून नेला राव! राहुरी घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात झालेले निधन ही केवळ एक दुर्घटना नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि भावनिक इतिहासावर पडलेली खोल जखम आहे. “पायलटला रनवे न सापडला” हे कारण कागदावर पुरेसे असू शकते; पण जनतेच्या मनाला आजही हा अपघात पटत नाही. कारण काही व्यक्ती अपघातात जात नाहीत—त्या अचानक हिरावून घेतल्या जातात. दादा त्यातलेच होते. दादांच्या अंत्यदर्शनासाठी उसळलेला जनसागर हा कोणत्याही सरकारी आदेशाचा परिणाम नव्हता. तो होता जनतेच्या मनातून उसळलेला आक्रोश. ग्रामीण महाराष्ट्राचा हा डॅशिंग, तडफदार आणि थेट बोलणारा नेता किती खोलवर रुजला होता, हे त्या अश्रूंनीच सांगितलं. दादा लोकप्रिय नव्हते, दादा लोकांच्या आयुष्याचा भाग होते. ते हजरजबाबी होते, पण जखम देणारे नव्हते. कडवे होते, पण क्रूर नव्हते. सत्ता त्यांच्या हाती आली, पण अहंकार कधीच आला नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचा त्यांनी स्वतःसाठी नव्हे, तर जनतेसाठी वापर केला. दादांचा पहिला पहाटचा शपथविधी जसा अविश्वसनीय वाटला होता, तसाच आज त्यां...

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

Image
 भाचा कधीच येणार नाही मामाच्या गावाला… राहुरी। शिवाजी घाडगे  प्रत्येक व्यक्तीला आपल्या मामाचं गाव जिव्हाळ्याचं असतं. कारण बालपणीच्या निरागस आठवणी, पहिल्या हशा-खेळा, मातीचा वास आणि माणसांचा ओलावा याच गावात जपलेला असतो. देवळाली प्रवरा हेच असे एक गाव होते—जिथे भाचे अजित अनंतराव पवार यांचा जन्म झाला. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर ही त्यांची जन्मभूमीच नव्हे, तर त्यांच्या आयुष्याच्या आठवणींचं माहेरघर होतं. “बालपणाचा काळ म्हणजे सुखाचा काळ” असे म्हणतात, आणि ते अजितदादांच्या बाबतीत अगदी खरं ठरतं. देवळालीच्या जत्रेतली भेळ, गोडीशेव, लहानपणी खेळलेले गोट्या, कोया, सुरपारंब्या, विट्टी-दांडू—या साऱ्या खेळांमध्ये त्यांचं बालपण हरवलेलं होतं. इथंच शिक्षण घेत, मातीशी नातं घट्ट करत ते मोठे झाले. राज्याच्या राजकारणात ते “साहेब” झाले, पण देवळालीसाठी ते नेहमीच ‘दादा’ राहिले. देवळाली प्रवरा येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी एक आठवण सांगितली होती— “आम्ही देवळाली प्रवरातून ज्वारीच्या बैलगाडीतून काटेवाडीला जायचो.” देवळालीत कदम कुटुंब हे ...

विमान आपघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह सहा जण विमान आपघात ठार

Image
बेक्रींग @घाडगे न्यूज  विमान आपघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विमान आपघात ठार  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह सहा जणांवर काळाचा घाला विमान आपघात मृत्युमुखी  अजित पवार हे देवळाली प्रवरा ता राहुरी जि अहिल्यानगर चे भाचे होते  दिवगंत नेते अजित पवार यांच्या दुखद निधनाने जिल्ह्यात हळ हळ व्यक्त करण्यात येत असून  बारामती जवळपास झाला विमान आपघात ते आठव्याद्या उपमुख्यमंत्री झाले होते  नगर जिल्ह्याला आणि विशेषतः देवळाली प्रवरा परिसराला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमीच अभिमान आणि आदर वाटत आला आहे. दादांचे बालपण देवळाली प्रवरात गेले असल्याने या भूमीशी त्यांची घट्ट नाळ होती. आजोळी येताना ते बालसवंगड्यांना, जुन्या ओळखींच्या माणसांना आवर्जून भेटायचे. “दादा, मी तुमच्या मामाच्या गावातला आहे,” असे कुणी सांगितले, की ते आपुलकीने चौकशी करायचे—काय अडचण आहे, काय काम आहे, कशी मदत करता येईल, हे विचारायचे. आपल्या आजोळाबद्दल, देवळाली प्रवराबद्दल दादांना विशेष जिव्हाळा होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुरी बाजार समितीत झालेल्या शेतकरी...

शौचालय दुरुस्ती बाबदचे आंदोलन तूर्त स्थगित-अप्पासाहेब ढुस

Image
 प्रसादनगर येथील शौचालय दुरुस्तीचे लेखी आश्वासन; आंदोलन तूर्त स्थगित – आप्पासाहेब ढूस घाडगे न्यूज।  देवळाली प्रवरा नगरपरिषदेने प्रसादनगर भागातील दोन्ही सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने २६ जानेवारी रोजी होणारे  आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी दिली.  ढूस म्हणाले की, आंदोलनापूर्वीच नगरपरिषदेने शौचालय दुरुस्तीचा निर्णय घेतल्याबद्दल नगरपरिषद प्रशासनाचे हार्दिक आभार. प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली आणि शौचालय दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला.   प्रसादनगर प्रभात सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय असून तेथे साठलेल्या मैल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांनी  नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा देत निवेदन सादर केले होते. त्यामध्ये २६ जानेवारी रोजी वाजत-गाजत नगरपरिषद कार्यालयात शौचालयातील घाण...

ड्रग्ज लपवले कोणाच्या घरात पुणे पोलिस नगर एलसीबीच्या दारात

Image
ड्रग्ज कोठे लपवले कोणाच्या घरात? पुणे पोलिस नगर एलसीबीच्या दारात  रिपोर्ट घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  नगर ड्रग्ज प्रकरणातील खाकीमागचा काळा चेहरा नगर ड्रग्ज प्रकरणाने संपूर्ण पोलीस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. नगर गुन्हा अन्वेषण विभागातील पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर याला पुणे स्थानिक गुन्हे शाखेने ड्रग्ज मुद्देमाल गायब केल्याच्या आरोपावरून अटक केली आणि खाकीतील गुन्हेगारीचा धक्कादायक पर्दाफाश झाला. मात्र या प्रकरणात प्रश्न अनेक आहेत आणि उत्तरे फारच कमी. शामसुंदर गुजर जिल्ह्यात नेमक्या कोणाच्या साथीने हे ‘पांढरपेशा’ गुन्हे करत होता? ड्रग्ज नेमके कोठे लपवले जात होते? कोणाच्या घरात, कोणाच्या आशीर्वादाने हा काळा धंदा फोफावत होता? विशेष म्हणजे, एलसीबीमध्ये येण्यापूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात शामसुंदर गुजर वादग्रस्त ठरला होता. मग अशा कर्मचाऱ्याला कोणाच्या शिफारशीवर नगर स्थानिक गुन्हे शाखेत घेण्यात आले? हा प्रश्नही अनुत्तरितच आहे. चर्चा अशी आहे की मुद्देमाल कक्षातून ड्रग्ज काढून त्याच वजनाचा तत्सम पदार्थ ठेवला जायचा आणि मूळ ड्रग्ज विक्रीस काढला जायचा. न्यायालयाकडून ...

खाकी आड लपलेली गुन्हेगारी पोलिस शामसुंदर जेल के अंदर

Image
खाकीच्या आड लपलेली गुन्हेगारी :   पोलिस शामसुंदर जेल के अंदर   रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे        नगर जिल्ह्यात घडलेले ड्रग्ज प्रकरण हे केवळ एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपकृत्य नाही; ते संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या ढासळलेल्या मूल्यव्यवस्थेचे भयावह प्रतिबिंब आहे. कायदा राबवणारा हातच जर कायद्याला हरताळ फासत असेल, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, हा प्रश्न आज उघडपणे उभा ठाकला आहे. एलसीबीसारख्या संवेदनशील शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर थेट ड्रग्ज तस्करीत अडकतो, ही बाब जितकी धक्कादायक आहे, तितकीच ती व्यवस्थेच्या अपयशाची कबुली आहे. श्रीरामपूर व संगमनेर येथील कारवाईत जप्त केलेल्या  मेफेड्रोनमधून १० किलो एमडी गायब होते, ही घटना अपघात नाही, तर अंतर्गत संगनमताशिवाय अशक्य असा गुन्हा आहे. हा मुद्देमाल कडेकोट बंदोबस्तात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कस्टडीत असताना त्याऐवजी मैदा भरला जातो, याचा अर्थ स्टॉक रूम सुरक्षित नव्हती की सिस्टीम प्रामाणिक नव्हती? याचे उत्तर आजही मिळालेले नाही. एकटा पोलीस कर्मचारी २५ कोटींचा खेळ करतो...

शंकर पगारे यांचे दु:ख निधन

Image
शंकर नाथा पगारे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन  आदिनाथ वसाहत येथील ज्येष्ठ नागरिक शंकर नाथा पगारे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने  परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. शंकर पगारे हे तनपुरे सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व मेहनतीच्या जोरावर सहकाऱ्यांमध्ये विश्वास संपादन केला होता. अत्यंत साधे जीवन जगत त्यांनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवला. अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी जीवनात अनेक अडचणींवर मात केली. कष्ट, संयम आणि मूल्यनिष्ठेचा आदर्श त्यांनी आपल्या कुटुंबासमोर ठेवला. त्यांच्या स्वभावातील आपुलकी, शांतपणा आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते परिसरात सर्वप्रिय होते. त्यांच्या पश्चात आर.पी.आय.चे माजी अध्यक्ष तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे, तसेच रावसाहेब पगारे, अरुण पगारे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. शंकर पगारे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्मलकृष्ण धाम येथे अंत्यसंस्का...

ड्रग्ज मध्ये पोलिस सहभागाचा गजर

Image
ड्रग्ज  मध्ये नगरच्या पोलिस सहभागाचा गजर ! घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे              नगर जिल्हा पोलीस दलात ड्रग्जप्रकरणाचा गंभीर गजर वाजला आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेने नगरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात मंगळवारी पहाटे ताब्यात घेऊन कारवाई केल्याने  खळबळ उडाली असून, ड्रग्जविषयक चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर एमआयडीसीत मोठी कारवाई झाली होती. त्यात देखील कोणी कोणी माती खाल्ली? आता मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की “करह झाला, कुपणच शेत खायला लागले” असे म्हणण्याची वेळ आली आहे. सामान्य नागरिकासाठी पोलीस म्हणजे आधार. अडचणीत असताना धावून येणारी यंत्रणा. खाकी पाहताच भल्या भल्या गुन्हेगारांची घामछूट होते. मात्र आज त्याच पोलीस यंत्रणेतील काही घटक थेट गुन्हेगारांना साथ देत अवैध धंद्यांचे भागीदार होत असतील, तर हा प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेचा न राहता संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा ठरतो. पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार मर्यादित असला, तरी त्यांचा रुबाब आणि अधिकार मोठा असतो. मग इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्...

पुण्याच्या ड्रग्ज तस्करीला नगर पोलिसांचा सहभाग

Image
पुण्याच्या ड्रग्ज तस्करीला नगर पोलिसांचा हातभार? एलसीबीच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ  राहुरी।घाडगे न्यूज  पुणे जिल्ह्यात वाढत चाललेल्या ड्रग्ज तस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का देत पुणे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर परिसरात कारवाई करत गॅरेज चालक शदाब शेख याला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचा ड्रग्ज व अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून तपासादरम्यान नगर पोलिस दलातील एका पोलिसाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एलसीबीकडून कसून चौकशी केल्यानंतर ड्रग्ज तस्करीच्या या साखळीत केवळ बाहेरील गुन्हेगारच नव्हे, तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले काही घटकही सहभागी असल्याचा संशय बळावला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला पुणे एलसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलीस दलाची विश्वासार्हता धोक्यात महत्त्वाची बाब म्हणजे, याआधी काही दिवसांपूर्वीच मल्टीस्टेट आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी पैसे घेतल्याच्या आरोपांमुळे पोलीस दल अडचणीत...

नवलकुमार तांबे यांचे दुःख निधन

Image
साहयक पोलीस कमिशनर नवलकुमार तांबे याचे दुःख निधन  राहुरी @घाडगे न्यूज   साहयक पोलीस कमिशनर  नवलनाथ ( मोंटी) लक्ष्मण तांबे यांचे सोमवार दिनांक 19/01/26 रोजी नाशिक येथे रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार विधी मंगळवारी दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी  अमरधाम नाशिक येथे होणार आहे.   नवलकुमार ताबे यांनी नगर जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून लोणी, शिर्डी पोलीस ठाण्यात काम केले नंतर त्यांची नाशिक येथे बदली झाले.  ते महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे विद्यार्थी होते अतिशय मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती 

नगरात दादांची राष्ट्रवादी मजबूत मोठे साहेब मात्र शुन्यावर

Image
एकेकाळी विनित पाऊलबुद्धे  एका वॉर्डात पराभूत झालेल्या गटाने आज संपूर्ण वॉर्ड ताब्यात घेतले. या सगळ्यात ‘भैय्या-दादा’ यांची दोस्ती आणि ‘घड्याळ-कमळ’ यांची सांगड कमाल घडवून आणणारी ठरली आहे. एकूण जागा : ६८  (शिंदे) – १० काँग्रेस – ०२ एमआयएम – ०२ शिवसेना (ठाकरे) – ०१ बसपा – ०१ राष्ट्रवादी (शरद पवार) – ०० मनसे – ०० समाजवादी पार्टी – ०० अपक्ष – ००

कुंभ मेळ्या आगोदर विकास कामे पुर्ण करा-विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम

Image
कुंभमेळ्यापूर्वीच शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम राहुरी । नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली सर्व विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण तसेच रस्त्यांच्या कामांचा वेग वाढवून ती कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण करावीत. गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय सोयीपेक्षा भाविकांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी दिल्या. आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा (२०२६–२७) यांच्या अनुषंगाने शिर्डी–शिंगणापूर परिसरातील भाविकांच्या गर्दीच्या नियोजनाबाबत साईबाबा मंदिराच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यास...

बेशिस्त वाहनांवर पोलीसांकडून कारवाई

Image
बेशिस्त वाहनांवर कारवाई  राहुरी ।घाडगे न्यूज  नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या चुकीच्या दिशेने धावणाऱ्या वाहनांवर शुक्रवारी राहुरी पोलिसांनी कडक कारवाई केली. या कारवाईत चुकीच्या दिशेने धावणाऱ्या ४ बससह इतर २८ अशी एकूण ३२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वाहनचालकांकडून एकूण २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच संबंधित चालकांना भविष्यात नियमांचे पालन करण्याची तंबी देण्यात आली. नगर–मनमाड राज्य मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनचालकांविरोधात ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस रस्त्यावर तैनात असल्याने वाहनांच्या वेगावरही आपोआप नियंत्रण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या राज्य मार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, अनेकांना पाठी व मानेच्या दुखण्याचा त्रास...

स्वच्छ व सुंदर संत ज्ञानेश्वर शाळा

Image
स्वच्छ व सुंदर शाळा – संत ज्ञानेश्वर विद्यालय शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे साहेब व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वामी विवेकानंद ट्रस्टचे उपाध्यक्ष व प्राचार्य भारत वारुळे यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धेत सहभागी झाले आहे. या उपक्रमामुळे शाळेचा आणि परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून गेला आहे.  पूर्वी साधा वाटणारा शाळेचा परिसर आज “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या भावनेतून लावलेल्या झाडांमुळे हिरवागार, फुलांनी नटलेला आणि प्रसन्न झाला आहे. झाडे कधी वाढली, कधी बहरली हे कळलेही नाही; मात्र आज संपूर्ण परिसर निसर्गरम्य दिसतो. पूर्वी विद्यार्थी दुपारच्या सुट्टीत जमिनीवर बसून मध्यान्ह भोजन घेत असत. त्यानंतर टाकळीमिया ग्रामपंचायतीचे सरपंच गायकवाड यांनी समोरील मैदानावर खडी टाकून दिली. कडेला वृक्षलागवड करण्यात आली. शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली आणि समोर भव्य क्रीडांगण विकसित करण्यात आले. आजूबाजूची अतिक्रमणे सामंजस्याने दूर करण्यात आली. हे सर्व परिवर्तन शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी य...

शहर विकासा साठी सर्वांचे सहकार्य हवे-नगराध्यक्ष सत्यजित कदम

Image
शहर विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – नगराध्यक्ष सत्यजित कदम देवळाली प्रवरा । देवळाली प्रवरा नगरपालिकेचा नावलौकिक अधिक उंचावण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, असा विश्वास नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केला. पत्रकार स्नेह-सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुधाकर कराळे होते. नगराध्यक्ष कदम म्हणाले की, मागील जवळपास चार वर्षांपासून नगरपालिकेवर शासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. यामुळे आरोग्य विभागातील ठेकेदार व कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे. काही भागात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून सार्वजनिक शौचालयांचीही समस्या आहे. तसेच घरकुल योजना व पालिकेचा संथ झालेला विकास पुन्हा जोमाने मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. वाड्या-वस्त्यांवर बिबट्याचा वावर वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे ५ हजार मर्क्युरी बल्ब बसवून परिसर प्रकाशमय करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून राज्य महामार्गाच्या कामामुळे पूर्वी चौपदरी असलेला रस्ता आता ३० मीटरवरून ...

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची पार्थडीत आपत्तीग्रस्त नागरीकांनी संवाद

Image
पाथर्डीत नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा संवाद राहुरी । पाथर्डी तालुक्याचा दौरा करत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथा जाणून घेत संबंधित यंत्रणेला गरजू शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ लवकरात लवकर पोहोचविण्याचे निर्देश दिले. पाथर्डी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, त्यांचा प्रत्यक्ष लाभ तसेच ‘कृषी यांत्रिकीकरण’ योजनेचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. उपजिल्हा रुग्णालयास भेट जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. उपचार घेत असलेल्या रुग्णांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्...

श्रीकृष्ण गोशाळेत मकरसंक्रांत हावरी गुळ गाईला खाऊ घातला

Image
श्रीकृष्ण गोशाळेत मकरसंक्रांत निमित्ताने गाईना गुळ व हावरी गाईल  खाऊ घातला  राहुरी। चिंचविहीरे येथील श्रीकृष्ण गोशाळेत बुबुधवारी गोरज मुहुर्तावर   मकर संक्रांत व एकादशी  दिवसाचे औचित्य साधून चिंचविहीरे येथील गोपाल कृष्ण गोशाळेच्या वतीने गाईना गोड  खाऊ घालण्यात आला यावेळी डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे काँग्रेस गटनेते दासू पठारे, काँग्रेसचे मार्गदर्शक वैभव गिरमे, कॉन्ट्रॅक्टर लांबे  तसेच जलनायक-पत्रकार शिवाजी घाडगे यांचा गोपाल कृष्ण गोशाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गोशाळेचे उपाध्यक्ष आर. डी. धोंडे पाटील, युवा कार्यकर्ते निलेश तनपुरे, बंटी लोंढे, कोबरणे,  गोसेवक अध्यक्ष ललित चोरडिया उपस्थित होते. नितीन तनपुरे परिवाराकडून सुमारे १०० किलो तिळगूळ दान देण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गोमातेचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी गोशाळेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य वास्तुची पाहणी केली. 

राहुरी फॅक्टरी बाह्य वळण रस्ता पहाणी

Image
राहुरी फॅक्टरी बाह्य वळण रस्त्याला गती प्रसादनगर–गुंजाळ नाका शिव रस्त्याची महसूल  पाहणी राहुरी  कणगर कडुन येणारी डम्पर खडी जड वाहतूक  अन्यत्र वळविण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी राहुरीचे तहसीलदार अमित पवार यांना निवेदन सादर केले होते. देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर ते गुंजाळ नाका (चिंचविहीरे) हा शिव रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर देवळाली प्रवरा मंडळ अधिकारी भिमराज मंडलिक आणि तलाठी गणेश गरकळ यांनी बुधवारी आप्पासाहेब ढूस व स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या शिव रस्त्याची सर्कल पाहणी केली. यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते तुकाराम पठारे, नगरसेवक शरद वाळुंज, प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख चंद्रकांत कराळे, शहरप्रमुख प्रकाश वाकळे, संपर्कप्रमुख गणेश भालके,  विष्णु गिते, शिवाजी गिते, देशमुख आदी सह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ात खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

Image
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा राहुरी।  राज्यातील सर्वशासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बँका आदी ठिकाणांवरून राजभाषा मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी १) मराठी भाषेचा इतिहास, २) मी आणि माझे लेखन ३) करू मातृभाषेचा सन्मान, महाराष्ट्र घडवू आपला महान, ४) मराठी भाषा आहे सक्षम, करण्या संस्कृतीचे रक्षण, ५) मराठी आमुचा अभिमान, मराठी आमुचा स्वाभिमान. यापैकी एका विषयावर कमीत कमी ५०० शब्द मर्यादेपर्यंत निंबंध २३ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालय, भुतकरवाडी, सावेडी, अहिल्यानगर येथे पोस्टाने किंवा समक्ष जमा करावे. विजेत्या स्पर्धकांचा ग्रंथोत्सवात मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. असे अशोक गाडेकर प्र. ग्रंथालय संचालक यांनी कळविली आहे. अधिक माहितीसाठी रामदास ...

देवळाली प्रवरात लोढा व शेटे होणार स्विकृत नगरसेवक

Image
बेक्रींग @घाडगे न्यूज  रुषभ लोढा व सचिन शेटे होणार भाजपाचे स्विकृत नगरसेवक  विरोधकांचे गटबंधन शेवटी झालेच नाही नाहीतर भाजपाचा एक व विरोधकांचा एक असे नगरसेवक झाले असते मंगळवारी पालिका सभागृहात पिठाधिसन अधिकारी करतील लोढा व शेटे याच्यावर नावावर शिक्कामोर्तब  लोढा यांना स्विकृत घेतल्याने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी निवडणूक पुर्वी दिलेला शब्द पाळला आहे  आजोबांचे स्वप्न केले नातवाने पुर्ण  गाधीवाले काका म्हणून परिचित असलेले  कांतीलाल लोढा हे नगरसेवक पदा साठी कधी काळी पराभुत झाले होते आता रुषभ यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले  आता नगराध्यक्ष सत्यजित कदम राहुरी फॅक्टरीवर उपनगराध्यक्ष पद देणार का पहावे लागेल

गावातील पोर आकाशात झेप घेणार

Image
गावाकडची पोरं आता आकाशाला गवसणी घालणार !  राहुरी  सर्वाना अभिमान वाटावा असे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यां ग्रामीण भागातील तब्बल ४२ गुणवंत विद्यार्थी आता थेट 'इस्रो'च्या (ISRO) अभ्यास दौऱ्यावर जाणार  या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये   टेक-ऑफ : १९ तारखेला ४२ विद्यार्थी आणि ८ अधिकारी अशी ५० जणांची टीम विमानाने झेपावणार.  याठिकाणी जाणार डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (थुंबा, केरळ), विश्वेश्वरय्या म्युझियम (बंगळुरू) आणि त्रिवेंद्रम येथील तारांगण व प्राणी संग्रहालय. अतिशय चागला उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये बाल वयात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृतहोईल. अशी  निवड प्रक्रिया : इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित जिल्हास्तरीय चाचणी परीक्षेद्वारे गुणवत्तापूर्ण निवड करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या (ZP) सेस फंडातून राबवल्या जाणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आता राज्यभर अनुकरण होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. या सर्व भावी शास्त्रज्ञांना या ज्ञानदायी प्रवासासाठी घाडगे न्यूज याच्या वतीने  खूप ख...

मॅकनेकल झाले आता विसापूर चे बंदी

Image
मेकॅनिक झाले   विसापूर कारागृहातील 'बंदी'  शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर सन्मानाने जगता यावे, यासाठी विसापूर खुल्या कारागृहातील बंद्यांच्या हाताला आता कौशल्याचे बळ मिळणार आहे. कारागृहातील बंद्यांसाठी दुचाकी व तीन चाकी वाहनांच्या दुरुस्तीचे (मेकॅनिक) प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून, हे पाऊल त्यांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ​जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने विसापूर जिल्हा खुले कारागृह (ता. श्रीगोंदा) येथे या उपक्रमाची सुरुवात झाली. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम, जन शिक्षण संस्थानचे संचालक बाळासाहेब पवार व कारागृह अधीक्षक विजय सोळंके यांच्या उपस्थितीत झाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. याविषयी माहिती देताना पंतम म्हणाले , केवळ शिक्षा भोगणे हा उद्देश नसून भविष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर बंद्यांना बाहेरच्या जगात वाहन दुरुस्तीचा स्वतःचा व्यवसाय...

आमदार हेमंत ओगले यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या कार्यकारणी सदस्य पदी नियुक्त

Image
महात्मा फुले विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून आमदार हेमंत ओगले  राहुरी ।प्रतिनिधी  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून आमदार हेमंत ओगले यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या कार्यकारी परिषदेवर आमदार विक्रम पाचपुते व आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले की, “माझ्यावर ज्या विश्वासाने ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन.” तसेच भविष्यात विद्यापीठातील नवनवीन कृषी संशोधन, शिक्षण व विस्तारकार्याच्या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ते योगदान देईन आणि विद्यापीठाचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहीन, अशी ग्वाही त्यांनी

माध्यमावर माझा विश्वास-माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

Image
मध्यमे समाजातील सर्व घटकाचा आवाज आहेत-माजी मंत्री प्राजक्त तनपुरे  राहुरी।प्रतिनिधी  माध्यमे समाजातील सर्व स्तरांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. त्यामुळेच आजही पत्रकारांवर समाजाचा विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर लोकशाही भक्कमपणे उभी आहे, असे मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने राहुरी नगर परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी बोलताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, लोकशाहीतील चार स्तंभांपैकी कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळावरचा माझा विश्वास हळूहळू उडत चालला आहे, कारण या ठिकाणी बहुमताच्या जोरावरच निर्णय घेतले जातात. मात्र न्यायपालिका आणि पत्रकारिता या तिसऱ्या व चौथ्या स्तंभावर माझा अजूनही ठाम विश्वास आहे. ते पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात केवळ दूरदर्शन माध्यम होते; मात्र आज मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील असंख्य वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणारे पत्रकार राहुरीत कार्यरत आहेत, याचा मला अभिमान आहे. समाजा...

राहुरी शनिशिगणापुर रस्त्यावर भिषण आपघात पाच जागीच ठार

Image
बेक्रींग @घाडगे न्यूज  भिषण आपघात पाच ठार  शनिशिगणापुर राहुरी रोड वर भिषण आपघात पाच ठार  प्रवासी वाहतूक रिक्षा व टॅव्हलस बस जोराची धडक  होऊन यात पाच निष्पापांचे बळी ठरले  ताबे पेट्रोल पंपा समोर झाला आपघात 

नगर मनमाड राज्य मार्ग पुर्ण होणार केव्हा

Image
अपुर्ण नगर मनमाड  महामार्ग पुर्ण होणार केव्हा  भाष्य घाडगे न्यूज | शिवाजी घाडगे आपल्याला स्वतःच्या जीवाची किंमत माहीत असेल, तर नगर–मनमाड राज्य मार्गावर सध्या प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणेच आहे. गेल्या एका वर्षात या रस्त्याने तब्बल ५५ निष्पाप प्रवाशांचे बळी घेतले, अनेकांना आयुष्यभराचे अपंगत्व दिले. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासन बघ्याची भूमिका घेत बसले आहे. इच्छा असूनही काहीच न करणे, हीच आज या यंत्रणेची ओळख बनली आहे. आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला—अगदी तशीच अवस्था! या रस्त्यावर अब्जावधी रुपये गिळंकृत झाले. खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण खड्डे मात्र आजही जिवंत आहेत. काम अर्धवट सोडून गेलेले ठेकेदार मोकाट फिरत आहेत. त्यांना ना काळ्या यादीत टाकले, ना एकही जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई झाली. मग प्रश्न असा आहे—हे पैसे गेले कुठे? आणि या मृत्यूंची जबाबदारी कोणाची? रस्ता आधी पूर्ण करण्याऐवजी महामार्गाच्या कडेला गटारे बांधण्याची घाई सुरू आहे. कदाचित मायबाप सरकारला रस्त्यापेक्षा गटारच अधिक प्रिय असावे. कुणा उद्योगपतीची वासाची पाइपलाइन सुरक्षित राह...

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार

Image
शहाबाजशहाबाज मित्रा… आता ही लोकसेवा कोण करेल यार… निशब्द घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  काही व्यक्ती असतात… ती मोठ्या पदावर नसतात, मोठी जाहिरातही करत नाहीत, पण त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसर हळ हळतो . राहुरी फॅक्टरी परिसरातील कामगार गाळ्यातील लोकसेवा केंद्र म्हणजे शहाबाज रफिक सय्यद. संगणकासमोर शांत बसून, कोणाचं केवायसी, कोणाचा प्रॉव्हिडंट फंड, पॅन कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी, कोणाचा नोकरी अर्ज, तर कोणाच्या खात्यात बाहेरगावी पैसे पाठवायचे—अशी असंख्य कामं तो काही कामे दुसर्‍याकडे पाठवून पुर्ण करुन घ्यायचा आपुलकीने करत असे. तो इंजिनिअर होता, पण “काम मिळालं नाही तरी माणसांची कामं थांबू नयेत,” या भावनेने तो रोज बसायचा. वय अवघं ३५ च्या आत… नव्या २०२६ वर्षातला पहिलाच शनिवार मात्र त्याच्यासाठी शेवटचा ठरला. सायंकाळी साधारण सहाच्या सुमारास, नेहमीसारखाच दुकानात असताना, अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला… आणि शहाबाज कायमचा शांत झाला. आताही विश्वास बसत नाही. कारण मी रोज सायंकाळी फिरून आलो की आपसूकच पावलं त्याच्या दुकानाकडे वळायची. “काय राव… काय चाललंय?” “प्रसाद कसा आहे?” असं आवर्जून ...

अक्षय कर्डीलेची गाडी राहुरी विधान सभेच्या दिशेने

Image
अक्षय कर्डीले यांची गाडी विधानसभेच्या दिशेने.... चर्चा घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले हे निवडणूक तयारीत सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. कर्डीले समर्थकांनी सध्या मोबाईलवर ‘किंग’ आणि गाडीचे टेटस मोठ्या प्रमाणात ठेवले असून त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या पश्चात अक्षय कर्डीलेच उमेदवार म्हणून पुढे येणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या जागेवर अक्षय कर्डीले यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली असून, आता पोटनिवडणूकही तेच लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले हे राहुरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाले होते. पराभवानंतरही त्यांनी पुन्हा जोरदार पुनरागमन करत आमदारकी मिळवली होती. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे राहुरीत पोटनिवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर अक्षय कर्डीले यांची गाडी राहुरीच्या दिशेने वेगान...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे "भगवे" उपरणे काय सुचित करते

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यातील भगवे उपरणे  काय सूचित करते? चर्चा घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यातील भगवे उपरणे आणि फोटोमागील भगवा बॅकग्राऊंड सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. नेमके तनपुरे यांच्या मनात काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शुक्रवारी त्यांच्या समर्थकांनी असे फोटो आपल्या मोबाईलचे स्टेटस ठेवले असून, भविष्यात होणाऱ्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने या भगव्या रंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या माहितीनुसार फेब्रुवारी २०२६ नंतर कधीही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. त्यादृष्टीने सध्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मागील विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला होता. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या दुर्दैवी निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून, प्राजक्त तनपुरे पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. अलिकडेच त्यांनी राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणत आपली ताकद दाखवून दिल...

राहुरी पोटनिवडणूक साठी मतदार यादी पुनरीक्षण करा-मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम

Image
 राहुरी पोटनिवडणूक मतदारयादी पुनरीक्षण  काटेकोरपणे राबवा -  मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम  राहुरी - आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीचे काम अत्यंत अचूक व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवून विहित वेळेत अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या. शिर्डी येथे २२३ - राहुरी विधानसभा ' मतदारसंघाची पोटनिवडणूक व विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.  चोक्कलिंगम म्हणाले, सध्याच्या मतदारयादीतील नावांचे २००२ च्या यादीशी जास्तीत जास्त 'मॅपिंग' करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात केवळ उर्वरित मतदारांचेच आवश्यक पुरावे घ्यावे लागतील. तसेच मतदारयादीतील दुबा...