राहुरी फॅक्टरी बाह्य वळण रस्ता पहाणी
राहुरी फॅक्टरी बाह्य वळण रस्त्याला गती
राहुरी
कणगर कडुन येणारी डम्पर खडी जड वाहतूक अन्यत्र वळविण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी राहुरीचे तहसीलदार अमित पवार यांना निवेदन सादर केले होते. देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर ते गुंजाळ नाका (चिंचविहीरे) हा शिव रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर देवळाली प्रवरा मंडळ अधिकारी भिमराज मंडलिक आणि तलाठी गणेश गरकळ यांनी बुधवारी आप्पासाहेब ढूस व स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या शिव रस्त्याची सर्कल पाहणी केली.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते तुकाराम पठारे, नगरसेवक शरद वाळुंज, प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख चंद्रकांत कराळे, शहरप्रमुख प्रकाश वाकळे, संपर्कप्रमुख गणेश भालके, विष्णु गिते, शिवाजी गिते, देशमुख आदी सह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment