राहुरी पोटनिवडणूक साठी मतदार यादी पुनरीक्षण करा-मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम

 राहुरी पोटनिवडणूक मतदारयादी पुनरीक्षण  काटेकोरपणे राबवा - 
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम 
राहुरी -
आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीचे काम अत्यंत अचूक व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवून विहित वेळेत अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

शिर्डी येथे २२३ - राहुरी विधानसभा ' मतदारसंघाची पोटनिवडणूक व विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

 चोक्कलिंगम म्हणाले, सध्याच्या मतदारयादीतील नावांचे २००२ च्या यादीशी जास्तीत जास्त 'मॅपिंग' करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात केवळ उर्वरित मतदारांचेच आवश्यक पुरावे घ्यावे लागतील. तसेच मतदारयादीतील दुबार नावे व ८५ वर्षांवरील मतदारांच्या नावांची तात्काळ पडताळणी करून याद्या अद्ययावत कराव्यात, असे त्यांनी सांगितले. 

मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा तपशीलात दुरुस्ती करणे यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांवर वेळेतच निर्णय घेणे बंधनकारक आहे. विशेषतः राहुरी मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या अर्जांची योग्य ती पडताळणी करून अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध होईल, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही चोक्कलिंगम यांनी दिल्या.



Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर