आमदार हेमंत ओगले यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या कार्यकारणी सदस्य पदी नियुक्त
राहुरी ।प्रतिनिधी
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून आमदार हेमंत ओगले यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या कार्यकारी परिषदेवर आमदार विक्रम पाचपुते व आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले की, “माझ्यावर ज्या विश्वासाने ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन.”
तसेच भविष्यात विद्यापीठातील नवनवीन कृषी संशोधन, शिक्षण व विस्तारकार्याच्या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ते योगदान देईन आणि विद्यापीठाचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहीन, अशी ग्वाही त्यांनी
Comments
Post a Comment