माजी मंत्री प्राजक्त तनपुरे "भगवे" उपरणे काय सुचित करते

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यातील भगवे उपरणे  काय सूचित करते?
चर्चा घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे 
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यातील भगवे उपरणे आणि फोटोमागील भगवा बॅकग्राऊंड सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. नेमके तनपुरे यांच्या मनात काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शुक्रवारी त्यांच्या समर्थकांनी असे फोटो आपल्या मोबाईलचे स्टेटस ठेवले असून, भविष्यात होणाऱ्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने या भगव्या रंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रशासकीय यंत्रणेच्या माहितीनुसार फेब्रुवारी २०२६ नंतर कधीही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. त्यादृष्टीने सध्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला होता. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या दुर्दैवी निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून, प्राजक्त तनपुरे पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. अलिकडेच त्यांनी राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली आहे. पोटनिवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच त्यांनी ही निवडणूक काटेकोरपणे हाताळली होती.
मागील निवडणुकीतील चुका पुन्हा होऊ नयेत, हा त्यांचा स्पष्ट उद्देश असून, आपल्या हातून गेलेली आमदारकी पुन्हा मिळवण्यासाठी तनपुरे सध्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. “पुन्हा लढायचं आणि आमदार व्हायचं” या उद्देशानेच त्यांनी गळ्यात भगवे उपरणे परिधान केल्याची चर्चा आहे.
देवळाली प्रवरा येथे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनावेळी हेलिपॅडवर प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले कारण प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत  मात्र आता नेमकी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी मागचे गमक काय एकनाथ शिदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सभागृहात त्यांनी प्राजक्त तनपुरे राज्य मंत्री असताना त्यांना आपण अधिकार दिल्याचे माजी मंत्री आमदार जंयत पाटील यांना उद्देशून सांगितले होते आता प्राजक्त तनपुरे यांनी  गळ्यात भगवे उपरणे परिधान केले. प्राजक्त तनपुरे यांचा हा नवा लूक राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.


Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन