गावातील पोर आकाशात झेप घेणार
राहुरी
सर्वाना अभिमान वाटावा असे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यां ग्रामीण भागातील तब्बल ४२ गुणवंत विद्यार्थी आता थेट 'इस्रो'च्या (ISRO) अभ्यास दौऱ्यावर जाणार
या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये
टेक-ऑफ : १९ तारखेला ४२ विद्यार्थी आणि ८ अधिकारी अशी ५० जणांची टीम विमानाने झेपावणार.
याठिकाणी जाणार डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (थुंबा, केरळ), विश्वेश्वरय्या म्युझियम (बंगळुरू) आणि त्रिवेंद्रम येथील तारांगण व प्राणी संग्रहालय.
अतिशय चागला उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये बाल वयात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृतहोईल.
अशी निवड प्रक्रिया : इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित जिल्हास्तरीय चाचणी परीक्षेद्वारे गुणवत्तापूर्ण निवड करण्यात येते.
जिल्हा परिषदेच्या (ZP) सेस फंडातून राबवल्या जाणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आता राज्यभर अनुकरण होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.
या सर्व भावी शास्त्रज्ञांना या ज्ञानदायी प्रवासासाठी घाडगे न्यूज याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा !
Comments
Post a Comment