जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची पार्थडीत आपत्तीग्रस्त नागरीकांनी संवाद

पाथर्डीत नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा संवाद
राहुरी ।
पाथर्डी तालुक्याचा दौरा करत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथा जाणून घेत संबंधित यंत्रणेला गरजू शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ लवकरात लवकर पोहोचविण्याचे निर्देश दिले.
पाथर्डी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, त्यांचा प्रत्यक्ष लाभ तसेच ‘कृषी यांत्रिकीकरण’ योजनेचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
उपजिल्हा रुग्णालयास भेट
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. उपचार घेत असलेल्या रुग्णांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची व मिळणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. तसेच रुग्णांना तत्पर व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याबाबत डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या दौऱ्यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्यासह महसूल, कृषी व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर