अक्षय कर्डीलेची गाडी राहुरी विधान सभेच्या दिशेने
चर्चा घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले हे निवडणूक तयारीत सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. कर्डीले समर्थकांनी सध्या मोबाईलवर ‘किंग’ आणि गाडीचे टेटस मोठ्या प्रमाणात ठेवले असून त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या पश्चात अक्षय कर्डीलेच उमेदवार म्हणून पुढे येणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या जागेवर अक्षय कर्डीले यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली असून, आता पोटनिवडणूकही तेच लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले हे राहुरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाले होते. पराभवानंतरही त्यांनी पुन्हा जोरदार पुनरागमन करत आमदारकी मिळवली होती. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे राहुरीत पोटनिवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर अक्षय कर्डीले यांची गाडी राहुरीच्या दिशेने वेगाने आगेकूच करताना दिसत आहे.
दरम्यान, एकीकडे प्राजक्त तनपुरे यांचे भगवे उपरणे, तर दुसरीकडे अक्षय कर्डीले यांची गाडी आणि टेटस, हे दोन्ही विषय सध्या राहुरीच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
वडील दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कर्डीले यांना ताकत दिली असून राहुरी वडीलानंतर अक्षय आमदार होणार का हे समजेलच आपल्या वडीलाचे अकाली जाणे यांची चिंता मनात असताना त्याच्या जागेवर जाण्यासाठी अक्षय यांची गाडी जोरात आहे
Comments
Post a Comment