राहुरी पोटनिवडणूकीत श्रीमंतीत भाजपाचे उमेदवार आघाडीवर

श्रीमंतीत भाजपाचे उमेदवार आघाडीवर; पत्नी प्रियंका यांच्या हातात 6 लाखांची रोख रक्कम
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्व उमेदवारांनी आपले संपत्ती विवरणपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना उमेदवारांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामुळे एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. सात उमेदवारांच्या या लढतीत कोणाच्या प्रचाराची, विचारांची किंवा विकासाच्या आराखड्याची चर्चा कमी आणि त्यांच्या संपत्तीचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक म्हणावी लागेल.
भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डीले हे श्रीमंतीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉटेल, पेट्रोल पंप, वाईन शॉप, शेती व दुग्धव्यवसाय अशा विविध स्रोतांमधून त्यांचे उत्पन्न येते. त्यांच्या कुटुंबाकडे असलेली मोठी संपत्ती आणि रोख रक्कम यामुळे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार असल्याचे दिसते
त्यांच्या कुटुंबाच्या नावावर हॉटेल, पेट्रोल पंप तसेच पत्नीच्या नावावर वाईन शॉप आहे. तसेच कुटुंबाकडे पाच वाहनेही आहेत.
अक्षय कर्डीले यांच्या हातात सध्या 18 लाख 22 हजार रुपये रोख स्वरूपात असून, पत्नी प्रियंका कर्डीले यांच्या हातात 6 लाख 12 हजार 900 रुपये रोख उपलब्ध आहेत. शेती, दुग्धव्यवसाय, वाईन व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असून, त्यांची एकूण संपत्ती 2 कोटी 27 लाख 57 हजार 387 रुपये इतकी आहे. ते उच्च शिक्षित असून त्याचे वय वर्ष 30 असून त्यांना एक मुलगी आहे. 
दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या हातात सुमारे 2 लाख रुपये रोख असून त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 25 लाख रुपये आहे. एक वाहन नावे असून शेती हे उत्पन्न स्त्रोत असून 
अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्या हातात 75 हजार रुपये रोख असून, त्यांच्या पत्नी सुनिता खेवरे यांच्या हातात 90 हजार रुपये रोख आहेत. रावसाहेब खेवरे यांची एकूण संपत्ती 75 लाख 79 हजार 800 रुपये असून, त्यांच्या पत्नींची संपत्ती 52 लाख 30 हजार 300 रुपये आहे. त्याचे शिक्षण दहावी असून त्याच्या पेक्षा त्याच्या पत्नीकडे रीख रक्कम असून 
शेती हे उत्पन्न साधन आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर