महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहुरीत
ब्रेकिंग @घाडगे न्यूज
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री सायंकाळी सुमारे ६.३० वाजता राहुरी येथे आयोजित प्रचार सभेत सहभागी होणार आहेत. या सभेत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचारासाठी मतदारांना संबोधित करणार आहेत.
या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भाजपाकडून निवडणुकीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून आचार सहिता पालन करीत सभेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुरक्षा व नियोजनाची तयारी सुरू आहे.
Comments
Post a Comment