मिरजगाव येथे लाचखोर पोलीस पकडला

ब्रेकिंग @घाडगे न्यूज
मिरजगाव येथे लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहात पकडला
मिरजगाव  स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबला संरक्षण देण्यासाठी लाच स्वीकारताना एका पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक सर्जेराव पवार असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो संबंधितांकडून ५,००० रुपयांची लाच घेताना जाळ्यात अडकला.
शहरात पत्त्याचा क्लब सुरु ठेवण्या साठी ५००० हजार  रुपये हप्ता महिन्या काठी देवा लागेल अशी मागणी संबंधित तक्रारदार याच्या कडे केली त्याने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाव घेऊन हकीगत विषद केली गुरुवारी ५००० हजार रुपये घेतांना पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली 
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित पत्त्याचा क्लब सुरू ठेवण्यासाठी संरक्षण देण्याच्या मोबदल्यात ही रक्कम स्वीकारली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. ठरलेल्या योजनेनुसार पवार याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून, पोलिस खात्याच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर