जेष्ठ गाईका आशा भोसले मागील वर्षी घेतले साई दर्शन

गाईका आशा भोसले मागील वर्षी आल्या होत्या साई मंदिरात 
घाडगे न्यूज। शिर्डी 
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची शिर्डीच्या साईबाबांवर अपार श्रद्धा होती. गेल्या वर्षी, २९ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी शिर्डी येथे येऊन साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले होते. त्या वेळी त्यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशीही मनमोकळा संवाद साधला होता. दुर्दैवाने, त्यांचे हे शिर्डीचे दर्शन शेवटचे ठरले.
आशा भोसले यांनी आपल्या समृद्ध आणि बहुआयामी गायन कारकिर्दीत साईबाबांवरील अनेक भक्तिगीते आणि भजने सादर केली आहेत. त्यांच्या सुरेल आवाजातील ही भक्तिगीते साईभक्तांसाठी आजही अनमोल ठेवा मानली जातात. त्यांच्या गायनातून प्रकट होणारी भक्तीभावना भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करते.
“साईभक्तांच्या हृदयात त्या सदैव जिवंत राहतील. त्यांच्या स्मृती आणि त्यांच्या आवाजातील भक्तिगीते भाविकांना कायम प्रेरणा देत राहतील,” अशा भावपूर्ण शब्दांत शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर