राहुरी पोटनिवडणूक मतदान सुरुवात

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मोठा बंदोबस्त
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात असून, गुरुवारी सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली होणाऱ्या मतदानात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 
मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव व नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे  नियोजन करण्यात आले आहे.
निवडणूकी साठी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या अधिपत्याखाली सर्व ३७४ मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानादरम्यान पेट्रोलिंगही सुरू असून, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. तसेच मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस दल व होमगार्ड यांच्यासह सीआयएसएफची एक कंपनी आणि एसआरपीएफची एक कंपनी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आली आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघ चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विभागलेला आहे. त्यामध्ये राहुरी, पाथर्डी, भिंगार आणि एमआयडीसी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गावांमध्ये मतदान सुरू आहे. संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच बारा सेक्टर पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर