प्राचार्य डॉक्टर नवनाथ दळवी यांची नियुक्ती

राहुरी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. नवनाथ दळवी यांची  नियुक्ती    घाडगे न्यूज।प्रतिनिधी                   
   राहुरी  आर व्ही धुमाळ महाविद्यालयाच्य   प्राचार्य म्हणून डॉ. नवनाथ दळवी यांना डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी स्वागत संमारंभ आयोजित कार्यक्रमात  
 अरुण  तनपुरे म्हणाले की डॉ. नवनाथ दळवी एक अभ्यासू दूरदृष्टी आणि संशोधनात्मक दृष्टीकोन असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या महाविद्यालयाला मिळालेले आहे
त्याच्या ज्ञानाचा निश्चित फायदा या महाविद्यालय होईल 
 प्राचार्य डॉ.दळवी हे  के.जे.सोमय्या महाविद्यालय,कोपरगाव येथे रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून गेली 32 वर्ष कार्यरत होते.डॉ. दळवी यांच्या ज्ञानाचा व कल्पकतेचा फायदा आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आणि आपल्या राहुरी तालुक्याला नक्कीच होईल तसेच ते आपल्या महाविद्यालयाचे नाव निश्चितपणे पुणे विद्यापीठांमध्ये उज्वल करतील असा विश्वास त्यांनी स्वागत समारंभ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष  अरुण तनपुरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले नवनिर्वाचित प्राचार्य डॉ.नवनाथ दळवी आपल्या मनोगतात म्हणाले की माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून मी या संधीचं सोनं करेन  आपल्या मार्गदर्शनाखाली  महाविद्यालयाचे नाव पुणे विद्यापीठातच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामवंत महाविद्यालय म्हणून ओळखले जावे यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन
 आहे.यानंतर प्राचार्य डॉ.नवनाथ दळवी हे महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल अशीच पुढे चालू ठेवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी  डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे आणि प्रेरणा पतसंस्थेचे  संस्थापक  सुरेश वाबळे  हे उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी हर्ष दादा तनपुरे यांनी डॉ.दळवी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर