Posts

भारताला ज्ञानाचा देश म्हणून ओळख हवी घोषणांचा नाही

Image
भारताला ज्ञानाचा देश म्हणून ओळख हवी घोषणांची नाही  भाष्य।शिवाजी घाडगे  शिक्षण हा देशाच्या विकासाचा कणा असतो. ज्या देशाने शिक्षण, संशोधन, विज्ञान आणि कौशल्य विकासाला प्राधान्य दिले, त्या देशाने जगाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेतील बदल हा केवळ अभ्यासक्रम बदलण्याचा विषय नसतो. तो देशाच्या भवितव्याशी संबंधित असतो. भारताच्या शिक्षण व्यवस्थेबाबत आज निर्माण झालेले प्रश्न त्यामुळेच गंभीर आहेत. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले. या बदलांमध्ये काही सकारात्मक उद्दिष्टे असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी, सरकारी शाळांची अवस्था, शिक्षकांची कमतरता, परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्न, खासगी शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजगाराशी शिक्षणाचा तुटलेला संबंध यामुळे चिंता वाढत आहे. आज ‘नीट’ परीक्षेभोवती निर्माण झालेला गोंधळ हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न म्हणून पाहणे धोकादायक ठरेल. तो देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थतेचे एक लक्षण आहे. नीटचा गोंधळ आणि तरुणांचा संताप वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो ...

तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरे द्यावेच लागतील !

Image
तरुणाईच्या प्रश्नांना उत्तरे द्यावेच लागतील! भाष्य।शिवाजी घाडगे  सीजीपीचा संस्थापक अभिजीत दीपके याच्यामध्ये एक पत्रकार दडलेला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती, सत्तेला थेट प्रश्न विचारण्याची हिंमत, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि तरुणाईच्या मनातील अस्वस्थतेला शब्द देण्याची हातोटी यामुळे त्यांनी उभी केलेली सीजीपी ही केवळ सोशल मीडियावरील संघटना राहिलेली नाही. तिने एका विशिष्ट काळात तरुणाईच्या असंतोषाला व्यासपीठ मिळवून दिले आहे. आजच्या राजकारणात हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वी आंदोलन उभे करायचे असेल तर पक्षाचे कार्यालय, संघटनेचे जाळे, कार्यकर्त्यांची फळी, मोठमोठ्या सभा आणि मोर्चे आवश्यक असायचे. आता एका मोबाईलच्या माध्यमातून प्रश्न उभा करता येतो, हजारो तरुणांना जोडता येते आणि काही तासांत एखादा मुद्दा देशव्यापी चर्चेचा विषय बनू शकतो. पारंपरिक राजकीय पक्षांना या बदलाची अजूनही पूर्ण जाणीव झालेली दिसत नाही. सीजीपीच्या आंदोलनाला मिळालेला तरुणाईचा प्रतिसाद याच बदलाचा संकेत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्य...

ध्येयाची नशा करा व्यसनाची नाही देवळाली प्रवरात विद्यार्थानी घेतली भारत नशामुक्त शपथ

Image
‘ध्येयाचा नशा करा, व्यसनाचा नाही’;  विद्यार्थ्यांचा नशामुक्त भारताचा संकल्प घाडगे न्यूज: प्रतिनिधी भारत सरकार आणि ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत देवळाली प्रवरातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, जनजागृती व्याख्यान आणि प्रबोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी केंद्राच्या प्रमुख विजया दीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या सहकार्याने देशभर ‘नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ राबविण्यात येत असून, चार कोटी युवक-युवतींना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. व्यसनमुक्त भारत ही केवळ सरकारी योजना नसून ...

अहिल्यानगर च्या शासकीय रुग्णालयांच्या 981पदाना शासकीय मान्यता

Image
अहिल्यानगरच्या ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदांना राज्य शासनाची मान्यता  घाडगे न्यूज @विशेष बातमी  अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी आवश्यक ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय  निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाचे कार्यक्षम संचालन, दर्जेदार आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला मोठी गती मिळणार आहे. राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शासन निर्णयानुसार रुग्णालयासाठी गट-अ, गट-ब आणि गट-क स...

मुळात ८५ टक्के पाणी

Image
मुळा धरणात ८५ टक्के पाणी शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्ह्याची जलसंजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा गुरुवारी सायंकाळपर्यंत २२,०१८ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) इतका झाला असून, तो धरणाच्या एकूण क्षमतेच्या ८५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या कोतूळ परिसरातून मुळा धरणाकडे ५,६३८ क्युसेक वेगाने नवीन पाण्याची आवक सुरू असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. मुळा धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट असून, पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आता केवळ १५ टक्के पाण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा धरणातील पाणी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी, शेती सिंचनासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धरणातील वाढता साठा लक्षात घेता आगामी रब्बी हंगामासाठीही...

व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वानी पुढे यावे-संभापती प्रा राम शिदे

Image
व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे : सभापती प्रा. राम शिंदे घाडगे न्यूज ।प्रतिनिधी तरुण हे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. "एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य – व्यसनमुक्त जिल्ह्याकडे एक सामूहिक पाऊल" या संकल्पनेवर आधारित या अभियानानिमित्त शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार...

नशामुक्त जीवन व व्यसनमुक्त समाज रॅलीचे आयोजन-जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

Image
अहिल्यानगर येथे व्यसनमुक्तीसाठी  भव्य ‘नशामुक्त जीवन’ जनजागृती रॅली- पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अमली पदार्थांचे वाढते सेवन, विविध प्रकारच्या व्यसनांचे समाजावर होत असलेले गंभीर दुष्परिणाम आणि तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी भव्य ‘नशामुक्त  जीवन’ व व्यसनमुक्त समाज जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक सुदर्शन म्हणाले की, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकारातून देशभर अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातही ‘नशामुक्त जीवन’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेबाबत जागर...

शेतीची ढासाळती अर्थव्यवस्था मजुरांचा ताण

Image
शेतीची ढासळलेली अर्थव्यवस्था : वाढता उत्पादन खर्च, मजुरीचा ताण  भाष्य।शिवाजी घाडगे  एकेकाळी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस शेतीने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले. ऊस उत्पादक म्हणजे सधन बागायतदार, अशी समाजात ओळख निर्माण झाली होती. परंतु गेल्या काही वर्षांत बदललेल्या आर्थिक समीकरणांमुळे हे चित्र झपाट्याने बदलले आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरीचे वाढलेले दर, रासायनिक खते व बियाण्यांच्या गगनाला भिडलेल्या किमती, बाजारातील अनिश्चितता आणि शेतमालाला न मिळणारा रास्त भाव यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेतीपासून दूर जात भुसार पिकांकडे मोर्चा वळविला. मात्र, तेथेही अपेक्षित आर्थिक समाधान मिळत नसल्याने शेती आज तोट्याचा व्यवसाय ठरत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढत आहे. ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक आहे. लागवडीपासून तोडणीपर्यंत साधारण वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागतो. या काळात खत, औषधे, पाणी, मजुरी आणि इतर खर्च सातत्याने वाढत जातो. दुसरीकडे अनेक ठिकाणी उसाच्या वजनातील कथित अनियमितता, तोडणीसाठी लागणारा मोठा खर्च, वाहतूक, बांधणी साहित्या...

राजपुत्र बोललेच नाही मात्र राजकारणात मौन चालत नाही

Image
राजपुत्र बोललेच नाही मात्र  राजकारणात मौन चालत नाही! भाष्य।शिवाजी घाडगे  महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष एका व्यक्तीकडे खिळले होते. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. पक्षातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. व्यासपीठावर आल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता होती. मात्र सुरुवातीला ते काहीसे संकोचलेले दिसले. काही क्षण ते शब्द शोधत असल्याचे जाणवले आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. भाषण अपेक्षेपेक्षा लहान राहिल्याने त्याची चर्चा राज्यभर सुरू झाली. राजकारणात एखादे भाषण हे केवळ शब्दांचे संकलन नसते. ते नेतृत्वाचा आत्मविश्वास, अभ्यास, विचारांची स्पष्टता आणि कार्यकर्त्यांशी असलेले नाते यांचे प्रतिबिंब असते. म्हणूनच अमित ठाकरे यांच्या या अल्प भाषणाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचवेळी एका भाषणावरून एखाद्या नेत्याचे संपूर्ण राजकीय मूल्यमापन करणेही तितकेच चुकीचे ठरते. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत वक्तृत्वाला नेहमीच मोठे स्थान र...

लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयअधिकारी कार्यालयाच्या वतीने सामूहिक ग्रंथवाचन

Image
लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात अधिकारी कार्यालया मार्फत सामूहिक ग्रंथ वाचन   प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसा निमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे  सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी ग्रंथालय निरीक्षक रामदास  शिंदे यांच्या हस्ते  लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी श्री.छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक  विद्यामंदिर, भूतकर...

लोकमान्य टिळक पुण्यतिथी माझ्या भाषणाची पहिली सुरुवात

Image
लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिनी माझ्या पहिल्या भाषणाचा जन्म   -शिवाजी घाडगे  लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने माझ्या वक्तृत्वाची, लेखणीचा आणि जीवन प्रवासाची सुरवात झाली  दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस देशभरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या आदराने साजरा केला जातो. अनेकांसाठी हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या एका महानायकाला अभिवादन करण्याचा असतो; पण माझ्यासाठी या दिवसाचे महत्त्व त्यापेक्षाही अधिक आहे. कारण हा दिवस माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ करणारा दिवस आहे. आजपासून तब्बल ३५ वर्षांपूर्वी, शालेय जीवनात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त केलेले माझे पहिले भाषण हेच माझ्या वक्तृत्वाचा जन्म ठरले. त्या दिवशी मिळालेल्या टाळ्यांचा कडकडाट आजही माझ्या कानात घुमतो आणि त्या टाळ्यांनीच माझ्यातील वक्ता, लेखक आणि पत्रकार घडविण्याची प्रक्रिया सुरू केली त्या वेळी मी छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला व्यासपीठावर उभे राहण्याची भीती वाटली नाही स्वतःवर विश्वास...

शोध पत्रकारीता लोप पावता कामा नयेत प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील

Image
शोध पत्रकारिता लोप पावता कामा नये ; माध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे – जयंत पाटील घाडगे न्यूजसाठी -श्रीरामपुरहुन @अनिल पाडे देशातील राजकीय, सामाजिक आणि तांत्रिक बदलांचा सर्वाधिक प्रभाव जर कोणत्या क्षेत्रावर पडला असेल, तर तो पत्रकारितेवर पडला आहे. पूर्वी समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी शोध पत्रकारिता आज दुर्मिळ होत चालली आहे. त्याऐवजी अनेक माध्यमांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप आणि तात्कालिक चर्चांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेने सत्य, वस्तुनिष्ठता आणि जनहित यांचा ध्यास सोडता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीरामपूर येथे आयोजित ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, लोकमतचे राजकीय संपादक यद...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
कापूस उत्पादक शेतकर्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन राहुरी। महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांतर्गत  कोंढवड येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या कापूस उत्पादक शेतकर्यांना विद्यापीठ शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, उद्यानविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सार अत्तार आणि दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे उपस्थित होते. याप्रसंगी कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे, सहायक कृषि अधिकारी भारती ढगे, दुर्गा शहाणे उपस्थित होते. यावेळी डॉ. खर्डे यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे उद्दिष्टे विषद केली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मंचामार्फत शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कापूस उत्पाद...

जिल्हा सहकारी बॅकसाठी विधानपरिषद संभापती प्रा राम शिंदे व माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील याच्या निर्णयाने रंगत

Image
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली; प्रा राम शिंदे व माजी खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय समीकरणे आकार घेत असून, बँकेच्या सत्तेवर कोणाचे वर्चस्व राहणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, माजी मंत्री तसेच बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के हे यावेळी निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना संधी मिळू शकते, असा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्येच नेतृत्व आणि वर्चस्वाची चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणांवर भाजपच्या वरिष्ठ ने...

श्रीरामपूरातील पोलिस उपनिरीक्षक वर लाचखोरीचा गुन्हा दाखल

Image
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाचखोरीचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील यवला येथे कार्यरत असतानाच्या प्रकरणाशी संबंधित असून, त्यांच्यासह दोन खासगी हस्तकांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात अटक न करणे व सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांनी ₹४ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीअंती ही रक्कम ₹२ लाख ५० हजारांवर निश्चित करण्यात आली. यातील ₹५० हजारांची रक्कम ऑनलाइन फोनपे  द्वारे स्वीकारण्यात आल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. ही रक्कम सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) याने स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर, सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) आणि जगदीश तुकाराम बोराडे (वय ३८, दोघेही रा. पाटोदा, ता. यवला, जि. नाश...

शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे पावित्र्य राखा

Image
 शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे पावित्र्य राखा  श्रध्दा।शिवाजी घाडगे  शिर्डी हे केवळ महाराष्ट्रातील एक गाव नाही, तर ते जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचे, विश्वासाचे आणि अध्यात्माचे केंद्र आहे. "श्रद्धा" आणि "सबुरी" हा साईबाबांनी दिलेला संदेश आजही लाखो भाविकांच्या जीवनाला दिशा देतो. देश-विदेशातून येणारे भक्त साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतात. त्यांच्या मनात एकच भावना असते बाबांचे दर्शन घ्यायचे, त्यांच्या चरणी माथा टेकवायचा आणि मनातील दुःख, वेदना व आशा त्यांच्या चरणी अर्पण करायच्या. मात्र, गेल्या काही दिवसांत शिर्डीत घडलेल्या काही घटनांनी साईभक्तांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, समाधीचे पावित्र्य, विशेष व्यक्तींना मिळणारी वागणूक आणि संस्थानचा कारभार यावर चर्चा सुरू झाली आहे. या प्रश्नांकडे भावनेने नव्हे, तर जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. अलीकडे मंदिर परिसरात एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. ज्या ठिकाणी लाखो भक्त स्वतःला सुरक्षित समजतात, त्या परिसरात अशी घटना घडणे ही...

पिसाळलेल्या कुत्र्या चा वृध्दाला चावा घेत ठार मारल अण्य 15 जणांना डसले

Image
पिसाळलेल्या कुत्र्याने वृद्धाचा फाडले १५ जणांना चावा घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने झोपेत असलेल्या एका वृद्धावर अत्यंत क्रूर हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवून आणला. याच कुत्र्याने परिसरातील सुमारे १५ नागरिकांनाही चावा घेतल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत वृद्धाचे नाव साहेबराव राघुजी वाघमारे (वय ७०) असे आहे. ते आपल्या दुकानासमोर नेहमीप्रमाणे झोपलेले असताना मध्यरात्री पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. कुत्र्याने त्यांच्या शरीराचा अक्षरशः चावा घेत फाडल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ला इतका भीषण होता की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन राहुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. १५ नागरिक जखमी; रेबीज प्रतिबंधक उपचार सुरू वृद्धावर हल्ला केल्यानंतर या पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरात ध...

श्रीराबुरच्या गुन्हेगारीवर सुदर्शन अस्त्र

Image
श्रीरामपूरच्या गुन्हेगारीवर सुदर्शन अस्त्र  स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  पायात रुतलेला काटा अर्धवट काढून चालत नाही. तो अर्धवट राहिला, तर प्रत्येक पावलागणिक वेदना देत राहतो. जोपर्यंत तो पूर्णपणे बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत आराम मिळत नाही. हाच न्याय समाजातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींबाबत लागू होतो. गुन्हेगारांवर कारवाई अर्धवट राहिली, भ्रष्टाचाराला मूक संमती मिळाली किंवा कायद्याची अंमलबजावणी निवडक पद्धतीने झाली, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या गंभीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करत असल्याचे वातावरण तयार झाले आहे. कोणत्याही पोलीस दलाची खरी ताकद केवळ गुन्ह...