बिबट्या आला अंगणी

बिबट्या आला अंगणी 
स्पाॅट रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे 
राहुरी फॅक्टरी येथे वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा बिबट्या दुष्टीस पडला अण अनेकानी याच देही याच डोळ्या बिबट्या पाहण्याचे भाग्य लाभले खरे मात्र सुदैवाने बिबट्याने कोणावर हल्ला केला नसल्याने जीवित हनी टळली?
 येथील स्वामी विवेकानंद आर्वेद महाविद्यालय व नर्सिग होम संध्या चांगलेच चर्चेत आहे असे असले तरी याच परिसरात पाठी मागे राहुरी कारखान्या वरील कामगार वसाहतीला पाणी पुरवठा करण्या साठी पाणी साठवण टॅक गेले अनेक दिवसांपासून आहे संध्या हा टॅक मध्ये पाणी साठवण होत नाही कारण कारखाना गेले अनेक वर्षांपासून बंद आहे   इंजिनिअरिंग काॅलेज 
, पब्लिक स्कूल देखील बंदच्या यादीत आहे तेव्हा या परिसरात प्रसाद नगर येथील लहान मुले शिवाजी प्राथमिक शाळेत, छत्रपती शिवाजी हायस्कूल, तसेच भरती साठीचे युवक तसेच सकाळ संध्याकाळी फिरणारे नागरिक व आर्वेद महाविद्यालय व नर्सिग होम तसेच औषध निर्माण चे विद्यार्थी यांची नेहमीच वर्दळ असते तर रात्रीला मंदिराचा अस्वाद घेणारे अथवा पॅलस्टीक गोळा करणार्या महिला असे हे ठिकाण अण गुरुवारी येथे बिबट्या पाण्याच्या टॅक मध्ये नजरी पडला ही वार्ता वारया सारखी पसरली व बघ्यांनी गर्दी केली दोन तास बिबट्या पाण्याच्या टॅक मधुन काढण्या साठी वन विभागांच्या कर्मचाऱ्यांनी मोठी कसरत केली कारण पाईप मधे बिबट्याअडकला होता दोन तासा नंतर बिबट्या पिंजऱ्यात घालण्यात वन विभाला यश आले आणि सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला 
पकडलेला बिबट्या डिग्रस येथील नर्सरीत नेण्यात येणार असून नंतर तो पुन्हा निसर्गात मोकळा सोडून देण्यात येणार 
बिबटे मानव वस्तीकडे आगेकूच झाले या बिबट्याने कोणावर हल्ला केला नसला तरी परिसरात बिबट्या वास्तव्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे 
बिबटे गारवा अथवा दाट झाडी असल्या ठिकाणी वास्तव करीत असतात 
स्व संरक्षणा साठी नागरिकांनी शासनाकडे शस्त्र परवाने मागितले आहेत मात्र स्थानिक पोलीस ठाण्याच्या कारभारयानी विरोधात अहवाल दिल्याने शस्त्र परवाने प्रकरणे प्रलंबित आहेत 


Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन