घामाचा पैसा चगंळवादा साठी खर्च नको

आपण घामाने कमावलेला पैसा चंगळवादा साठी भांडवलदारांच्या खिशात घालु नका असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषद च्या त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यान मालेत केले अध्यक्ष स्थानी शिवाजी मुसमाडे होते उपआयुक्त विकास नवाळे यांनी प्रास्ताविक केले 
युवराज पाटील म्हणाले की टिव्हीवर जाहीरीत दाखवलेल्या अत्तरा पेक्षा कष्ट करताना आलेला घामाचा वास हा सर्वक्षेष्ट आहे माध्यमानी आपल्या मन, मनगट, मेंदु आळशी बनवला त्यात सोशल मिडीयाची भर पडली आहे 
जिवन सुंदर आहे त्या साठी आपल्या भावना जिवंत असायला हव्यात आपल्या खिशातली पैसा भांडवलदारांच्या खिशात घालण्याचे काम जाहीरीती करत आहे 
अतंराळ विर सुनिता विल्यम्स ह्या अडकल्या माध्यमे दाखवत होते तर नासा व त्या स्वतः पृथ्वीवर येण्यास काही अवधी लागेल असे सांगत होते 
जुगाराच्या व गुटख्या च्या जाहीराती दाखवत गल्ले लठ्ठ होणार्याना लोकांचे सुंदर जिवन उध्वस्त करायचे आहे 
आपल्या वाढदिवसाला तलवारीने केक कापून आपण काय साध्य करतो कोणी तरी कमेट मध्ये हिरो म्हणतो परतु आजारी मानसाला दवाखान्यात घेऊन जाणारा, मदतीला धावून येणारे तसेच राष्ट्रीय युग पुरुष आपले खरे हिरो आहेत शेती तोटय़ात गेली म्हणून आत्महात्या केलेल्या कुटुंबाला कर्जातून बाहेर काढून यशस्वी झालेल्या महिला आहेत, यशस्वी नवीन संशोधन करीत उत्कृष्ट शेतकरी तसेच गावातील तरुण मुले लोकसेवा आयोगामार्फत  घेतलेल्या परिक्षेत यश संपादन करून यशस्वी झालेले माध्यमाना दिसत नाही का असा सवाल उपस्थित करीत घरात टिव्ही आल्या पासून घरात राक्षस आला की काय दिवाळी आली ही उठा उठा आघोळ करण्याची जाहीरीत कोट्यावधी रुपये आठ दिवसात कमवतात आपल्या प्रश्न पडत नाहीत संगीत, वाचन, खेळ खल्लास झालेत राग हेच दुःखाचे खरे कारण आहे अंहकारा मुळे आजार आले आहेत सुंदर जिवन व जबाबदारी  पृथ्वीवरील प्रतेक घटक जगला पाहीजे हव्यास पाई सुंदर जिवन दुःखी होत चालले आहे माकडाच्या मुठीतील शेंगा मुळे त्यांचा हात गुतुन पडावा तसे आपण दुःखाला कवटाळून बसलो आहोत 
यावेळी  माजी आमदार चंद्रशेखर कदम, विश्वास पाटील, बाबा साबारे, राहुरी न.पा .चे  मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोबरे,  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, तालुका कृषि अधिकारी बाबासाहेब शिंदे, माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील, साई आदर्श मल्टीस्टेट चे अध्यक्ष शिवाजी कपाळे, रामभाऊ काळे, प्रियतमा कदम, जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे, आदी सह श्रोते उपस्थित होते 
उपआयुक्त पदोन्नती मिळाल्या बदल प्रशासकीय सत्कार पोलीस,  नगरपरिषद,कृषि विगाच्या वतीने करण्यात आला 
याच वेळेस विकास नवाळे यांची छोटीशी कन्या हीने केलेले भाषण देखील भारीच होते 
यशवंत विद्यार्थाचा यावेळी सत्कार करण्यात आला 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन