सोसायटीत परोगामीचा कचरा छत्रीला कपबशीचा चटका...!

काय राव केला की पुरोगामीचा  कचरा 
छत्रीला कपबशीचा बसला चटका !
नेमक घडल काय @ पत्रकार शिवाजी घाडगे 
शंभर टक्के वसुलीची हमी असलेली व एका अर्जावर लाखो रुपये कर्ज वितरीत करणारी 
अ.नगर डिस्टिक्ट सेकंडरी टीचर्स कोपरीटीव्ह ऑफ क्रेडिट सोसायटी
लिमिटेड म्हणजे शिक्षक सोसायटीत पंचवीस वर्षां नंतर सत्ता परिवर्तन झाल्याचे सोमवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. हा निकाल पुरोगामी सहकार मंडळाला चांगली चपराक मानली जाते. 
23 मार्चला 21 जागा साठी मतदान झाले होते व 24 ला कल्याण रोडवरील एका खाजगी मंगल कार्यालयात मतमोजनी झाली व 21 जागेवर स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे उमेदवार भरगोस मताधिक्याने विजयी झाले 
अण कपबशी ने छत्रीला धक्का दिला .
पुरोगामी सहकारचे नेतृत्व माजी चेअरमन भाऊसाहेब कचरे हे करत होते आपण दगड उभे केले तर सभासद निवडुन देतात या भ्रमात कचरे असावे म्हणून तर कचरे सेवानिवृत्त होऊन तीन वर्ष उलटले तरी
दरोज तीन वाजेपर्यंत कचरे संस्थेच्या मुख्य कार्यालयत कायम बसायचे अशी चर्चा निवडणूकीत ऐकायला मिळाली 
संस्थेचा चेअरमन नेहमी सांग काम्या करायचा व त्यांच्या खुर्चीवर बसून कचरे लहान पोरा सारखे खुर्चीवर गरागरा बिगायचे ज्या सेवानिवृत्तीचा मुद्दयाची मशाल घेऊन कचरे यांनी सोसायटीत पाय ठेवला तो त्याच मुद्याने कचरे यांच्या पॅनलचा सुपडा साफ केला. 
गेली पंचविस वर्ष  ते पाय रोवून घट्ट सोसायटीच्या खुर्चीवर बसले नेहमी काय राव मित्रा अशी गोड हाक मारत ते सभासदाना भाळवत असत मात्र यावेळेस परिवर्तन कडुन जो  आर पारचा प्रचार झाला त्यात कचरे यांच्या पॅनलचा कचरा झाला 
मुळात जुन्या संचालकाना उमेदवारी देणे कचरे यांनी टाळले व येथेच परिवर्तनच्या कपाच्या मदतीला बशी धाऊन आली नाहीतर तो पर्यंत कप टागलेल्या अवस्थेत होता 
आपल्याच नातेवाईक संस्थेत नोकरीला चिकटवले तसेच ऑडिटर ला लाखो रुपये दिले जातात तरी इन्कमटॅक्स लाखो रुपयाचा दंड केला 
मयत निधी कापला जातो मग अजून काही कुटुंब वंचित कसे या सह कचरे सेवानिवृत्त झाले तरी सोसायटीत आजुन येतात कसे व आता पुन्हा सत्तेवर आले तर ते प्रशासकीय अधिकारी म्हणून पोस्ट तयार करुन दररोज संस्थेत येतील या सह असंख्य मुद्दे प्रचारात प्रभाव करीत होते तेव्हा हे पर्स मध्ये छत्र्या भरत होते. 
तर दुसरीकडे संचालक अप्पा शिंदे कचरे विरोधक एकत्र करण्या यशस्वी झाले कचरे असताना शिंदे निवडुन येत होते सहाजिकच भाऊसाहेब कचरे सेवानिवृत्ती नंतर अप्पा शिंदे सोसायटीत नेते झाले व त्यांना जुनी पेन्शन योजनेची साथ लाभली शिक्षकां साठी नेहमी आंदोलन व मदतीला धावून जाणार व्यक्तीमत्व म्हणून अप्पा यांची प्रतिमा कायम ठेवण्यात शिंदे यशस्वी झाले तर दुसरीकडे कचरे यांची मुलाखत घेणाऱ्याला त्यांनी गेट बाहेर बसवले तर संचालकाचे काय तसेच 
एका छोट्या शाळेवर दोन उमेदवार देऊन आपण कसे उत्तम काम करतो व आपल्या कचरे यांनी पुरोगामीचे अध्यक्ष केले मग मागील पाच वर्षा पुर्वी यांना उमेदवारी  कोणत्या कारणाने डावलली याचे उत्तर स्वतः अध्यक्ष देऊ शकले नाहीत 
असे असले तरी परोगामी आपले खाते सुध्दा या वेळी उघडू शकली नाही ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल 
आता सत्ता आली परिवर्तन ची तेव्हा जास्त हवेत न राहता व ज्या चुका कचरे यांनी केल्या त्या सुधारत परिवर्तन कारभार करावा लागेल नाहीतर पहिल्याच दिवशी चेअरमन पदावरुन आरडाओरड विरोधात असताना कचरे तुम्हाला आरडाओरड करायला लावायचे मात्र तुम्ही आता सत्तेत आहात हे लक्षात ठेवा कारण शंभर टक्के वसुली असलेली ही संस्था आहे असा पारदर्शी व विश्वात्मक कारभार करा की सभासदानी सत्ता परिवर्तन केल्याचा पच्छाताप झाला नाही पाहीजे 
सत्तेत उतणार नाही, मातणार नाही सभासदाच्या कल्याणाचा वसा सोडणार नाही या तत्त्वाने कारभार करावा लागेल 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन