सलाम राहुरी पोलीस

सलाम राहुरी पोलीस 
74 मुलीची केली घरवापसी..!
खरय @ पत्रकार शिवाजी घाडगे 
हरवलेल्या मुलीचा शोध घेत पुन्हा त्याना आपल्या पालकांच्या ताब्यात दिल्याची कामगिरी राहुरी पोलिसांनी बजावल्याने सलाम पोलीस मामा असेच म्हणावे लागेल. 
ऑपरेशन मुस्कान अंर्तगत वर्षभरात जवळपास  74 मुली शोधून आणल्या आहेत 
मुलीच्या आई वडीलांना जणु काही पोलीसांनी हसविले !
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या टीम ने रुबाबदार कामगिरी बजावली असून राहुरी तालुक्यातील 74 म्हणजे सरासरी महिन्यात किमान 6 मुली परत आणल्या आहेत. 
यामुळेच पालकांनी व समाजाने देखील या गंभीर विषयाची जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
काही वेळेस मुली सदन्याण असल्यावर पोलीस देखील हतबल होतात दिसतात 
मुलगी म्हणजे काचेचे भाडे असते मात्र अल्पवयीन मुलीना फुस लावून पळुन नेणाऱ्या ठगाणा राहुरी पोलीसांनी चांगला दणका दिला आहे. 
फुस लावून नेणाऱ्या चा तपास लावताना पोलिसांची देखील मोठी कसतर होते. 
शाळा व महाविद्यालयत देखील राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. 
तर सार्वजनिक ठिकाणी देखील पोलीसाचे सी सी टीव्ही कॅमेरा लक्ष ठेवून आहेच. 
राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिनाम सप्ताह मध्ये कधी टाळ हाती घेतात व मुलीकडे जातीने लक्ष ठेवून 
 काळजी घेण्याचे अहवान करायला विसरत नाही. 
वर्षाभरात पुन्हा आपल्या घरी आणून पोरीच्या डोक्यावर आई वडिलांचे छत पांघरुण दिलय. 
 किमान 74 मुलीची घरवापसी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घडवून आणली आहे. यामुळेच पोलीस दादा ला परत आलेल्या मुली आता पोलीस मामा म्हणु लागल्यातर नवल नाही. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर