राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत राबविण्यात आलेल्या आमली पदार्थ जनजागृती अभियान सांगता

राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने  राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ व्यसन मुक्त अभियानाची   सांगता

      राहुरी पोलीस  ठाण्याच्या वतीने 
 जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शना खाली 13 ऑगस्ट सुरु झालेल्या पाच दिवस राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान ची रविवारी महात्मा फुले कृषि विद्यापीठात सांगता करण्यात आली राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले 
 सदर अभियाना दरम्यान राहुरी शहर व तालुक्यातील शाळा व विद्यालयातील 9000 विद्यार्थ्यांना राहुरी पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच अभियानाअंतर्गत  शालेय विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना शुक्रवारी 15 ऑगस्ट 2025 रोजी राहुरी तालुक्याच्या मुख्य ध्वजारोहण प्रसंगी पारितोषिक वितरण करण्यात आले.
    अभियानाची सांगता आज रविवारी  17 ऑगस्ट रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डॉ.सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षा व कार्यशाळा या कार्यक्रमासाठी  राज्यातून आलेले सुमारे 1200 विद्यार्थी व त्यांचे सुमारे 2400 पालकांना अंमली पदार्थ  विरोधी जनजागृती अभियाना अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर सदर अभीयाना अंतर्गत रॅली काढूनजनजागृती केली. सदर रॅलीमध्ये विद्यार्थी व पालकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर