शिवप्रतिष्ठान आयोजित नवदुर्गा जागर रॅली
दुर्गामाता दौड शहरातील विविध भागातून भगव्या झेंडा मिरवणूक तसेच भगव्या टोप्या परिधान तसेच हातात भगवा ध्वज घेऊन युवक सहभागी .
शहराच्या संपूर्ण भागातून ही दौड पहाटे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करून सकाळी सात वाजता निघत असते. नवरात्रीचे नऊ दिवस ही दौड निघत असते.
या दवडीमध्ये लहान मुलांपासून तरुण मुलांपर्यंत तसेच युवती देखील सहभागी असतात.
शिव छत्रपति शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज रक्तगटाची युवा पिढी निर्माण व्हावी.ही पिढी सदृढ असावी, देव देश धर्माचं रक्षण करणारी असावी यासाठी नवदुर्गेचा जागर हा उपक्रम आहे.
हिंदू ग्रुप राहुरी शहर, अखंड हिंदू समाज यातील सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी असतात.यात अनेक पद्य व देशाहिताचे गीत म्हंटले जातात.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिथे जिथे आहे तिथे तिथे देशभर या मिरवणुका निघतात, अनेक संघटनांचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असतात. मोठ्या उत्साहात आणि जोशामध्ये या मिरवणुकीचे स्वागत केले जाते. महिला या ध्वजाला ओवाळतात आणि औक्षण करतात
Comments
Post a Comment