नगराध्यक्ष पदाचे चित्र स्पष्ट

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्पष्ट 
मी पुन्हा येईल.... 
घाडगे न्यूज @ नामनिर्देशनपत्र भरत आहे 

गेल्या चार वर्षांपासून पालिकावर प्रशासकीय राज असल्याने कार्यकत्यांना आलेली मरगळ व नगराध्यक्ष थेट जनतेतुन असल्याने नगरसेवक पदा करीता उमेदवार शोधाशोध करताना दमछाक  
 श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदा साठी चुरस
निर्माण झाली असून काॅगेस,  दोन शिवसेना, भाजपा अशी चौरंगी लढत फायन मानली जात 
काॅगेस चे करण ससाणे, भाजपा श्रीनिवास बिहाणी, शिवसेना शिंदे प्रकाश चित्ते, शिवसेना उबाठा अशोक थोरे असे उमेदवार नगराध्यक्ष पदा साठी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढत असून माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक मात्र नगरसेविका साठी प्रभागात उभ्या रहाणार आहे 
भाजपा, शिवसेना, काँग्रेस अशी लढत  अशोक थोरे यांनी यापूर्वी विधान सभेची निवडणूक लढविली होती तर बिहाणी यांना उमेदवारी ची लाॅटरी लागली 
करण ससाणे यांचे  दिवंगत नेते वडील माजी आमदार जंयत ससाणे 
 व आई राजश्री ससाणे यांनी या पालिकेत नगराध्यक्ष पद भुषविले आहे 
देवळाली प्रवरा नगरपालिके साठी देखील चौरंगी लढत होत असून भाजपा चे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, काॅगेस कडुन काॅगेस शहर अध्यक्ष कृष्णा मुसमाडे, शिवसेना (शिंदे) बाबासाहेब मुसमाडे, वंचित बहुजन अॅड प्रसाद सागळे अशी लढत होईल 
सत्यजित कदम हे राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव व याच नगर पालिकेचे मागील पाच वर्ष नगराध्यक्ष होते 
कृष्णा मुसमाडे हे काॅगेस चे शहर अध्यक्ष व तनपुरे साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत त्यांचे वडील शेतकरी संघटनेचे तसेच तनपुरे साखर कारखान्याचे संचालक होते तर बाबासाहेब मुसमाडे हे व्यावसायिक असून त्याच्या उमेदवारीला मुंबईहून कायम करण्यात आली 
प्रसाद सांगळे विधीतज्ञ आहेत 
दुसरीकडे उमेदवारी देताना सगळ्याच पक्षाची मोठी कसरत झाली तर कागद पत्र गोळा करताना उमेदवाराची त्रेधातिरपीट उडाली 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर