कोपरगावात राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काळे-कोल्हे संर्घष

 कोपरगावात राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काळे-कोल्हे.....
घाडगे न्यूज- 
फेरफटका | शिवाजी घाडगे 

कोपरगाव नगरपालिकेची  नगराध्यक्ष व नगरसेवक पंचवार्षिक निवडणूक होत असून 
आमदार अशुतोष काळे व चेअरमन विवेक कोल्हे यांची राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी स्पर्धा सुरु असुन आपले नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणून शहरावर राजकीय वर्चस्व ठेवून भविष्यात विधानसंभा डोळा ठेवून आहेत काका व अक्का भोवती फिरवून 
निवडणूकीत मुळ प्रश्नाला बगल तर दिली जात नाहीना 
काका हे मल्टीस्टेट मधील नामाकित नाव ओमप्रकाश कोयटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते काका नावाने परिचित आहेत 
त्यांनी कोल्हे कुटुंब आपल्याला वर्षोनो वर्ष त्रास देतय अशी आरोळी निवडणूक निमित्ताने ठोकली म्हणून विवेक कोल्हे यांनी काकाच्या अक्का ला टार्गेट करून अक्काला झोडून काढले आणि निवडणूक आपल्या भोवती घेतली तस कोपरगाव कराना अक्का चे प्रताप जास्त माहीत 

काळे-कोल्हे घराण्याचा जुना सर्घष निमित्त मात्र नगरपालिकेच 
जिल्ह्यात संध्या नगर पालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असुन कोपरगाव नगर पालिकेत मात्र चौरंगी लढत होणार असली तरी आता ही लढत दुरंगीत आणून ठेवली आहे 
भाजपाचे पराग संधान व राष्ट्रवादीचे ओमप्रकाश कोयटे यांच्यात आणलीय आहे 
कारण दोघांच्या विरोधात दोन माजी नगराध्यक्ष निवडणूक लढवत आहेत ते शिवसेना शिंदे राजेंद्र झावरे तर अपक्ष सुहास वाढणे 
दिवंगत मिजी खासदार सूर्यभान वाढणे यांचे  चिरंजीव सुहास वाढणे पुन्हा अपक्ष निवडणूक लढवत आहेत ते मागील निवडणुकीत अपक्ष जनतेतुन नगराध्यक्ष झाले होते खरतर भाजपा साठी जनसंघा पासून दिवंगत नेते सूर्यभान वाढणे भाजपाचे आता केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे कदाचित सुहास वाढणे सारखे अनेक निष्ठावान भाजपा पासून दुर केले गेलेत अण धंदेवाईक बेरड जमा झाले आहेत हे सहन होत नसल्याने वाढणे पुन्हा नगराध्यक्ष पदा साठी उभे आहेत याच्या वडीलांनी भाजप निष्ठेचा फायदा यावेळेस सुहास वाढणे यांना होऊ नये म्हणून खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्र्यांनी मात्र कोणाला दुखवले नाही जो पर्यंत मी आहे तो पर्यंत लाडकी बहीण योजना सुरु राहील असे सांगून बहीणीनी आपल्या पक्षाच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले 
तसेच दुसरे शिवसेनैचे राजेंद्र झावरे देखील येथे उभे आहेत या शहरात पहिल्यांदा राजेंद्र झावरे जनतेतील पहिले नगराध्यक्ष होते काळाच्या ओघात शिवसेनेत अंर्तगत कलह मध्ये राजेंद्र झावरे यांच्या सारखे अनेकांच्या आयुष्याचे खत झाले ज्याचे वाळु बरोबर चांगले संबंध होते तेच संपर्क प्रमुखांना प्रिय होते 
तशी कोपरगाव मध्ये माजी दिवंगत माजी खासदार शंकरराव काळे व दिवंगत माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे आप आपसात राजकीय मतभेद ठेवून सकारातील सकारात्मक राजकारण करत आमदारकी व खासदारकी कोपरगावात कायम ठेवून आपले साखर कारखान्यावर कायम वर्चस्व ठेवून राजकारण केले आता दोन्ही नेत्याचे नातु कोपरगावात राजकारणात सक्रिय असून आमदार अशुतोष काळे यांना विधान संभा निवडणूकीत चेअरमन विवेक कोल्हे यांनी मदत केली होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या शब्दा खातर अशुतोष आमदार झाले आणि आता बोलु लागले आम्ही त्यांना पाठींबा मागितला नव्हता मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस दादा वतीने काका कोयटे यांना उमेदवारी दिली तस विवेक यांना अण्य नगर पालिके प्रमाणे येथे राष्ट्रवादीने भाजपाला नगराध्यक्ष पदाची संधी द्यायला हवी होती अस वाटत असताना तेथे काकाच्या आक्का वर तोड सुख घेतले स्थानिक   नगर पालिका निवडणूकीत भाजपाचे कमळ फुलवून कमाल करायची 
 तस काळे-कोल्हे यांनी ही निवडणूक बरोबर आपल्या दोघा भोवती आणली असून संध्या कोपरगाव नगराध्यक्ष पदाची निवडणूक मोठी चुरशीची करून ठेवली असून भविष्यात कोपरगाव विधानसंभेची रंगीत तालीम  सुरु असुन काका व आक्का मात्र मोकार फुगले आहेत तेव्हा कोपरगाव कर नेमका कोणाचा फुगा फोडणार हे निकाला नंतर समजेल 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर