संगमनेरात हात गायब सत्ये साठी मैथिली सुर्वण मध्य
संगमनेरात हात गायब......
घाडगे न्यूज
फेरफटका @शिवाजी घाडगे
संगमनेर मध्ये दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे झाल आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबियांत संगमनेर राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी शह कटाक्षाचे राजकारण सुरु आहे सुरु आहे .
आ. अमोल खताळ यांच्या पेक्षा आ. सतायजित तांबे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे.
सत्यजित यांचे वडील माजी आमदार डाॅक्टर सुधीर तांबे तसेच मातोश्री दुर्गाताई तांबे यांनी या पालिकेचे नगराध्यक्ष पद भुषविले असून आता आमदार सत्यजित यांच्या पत्नी मैथिली नगराध्यक्षा पदा करीता सेवा समितीच्या उमेदवार असुन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत एक मात्र डाॅक्टर सुधीर तांबे यांनी थोराताचा शब्द कधी. डावलला नाही म्हणून ते नगराध्यक्ष व आमदार झाले उलट सत्यजित यांनी आमदार होण्या साठी काँग्रेसला मामा बनविले आता काॅगेस निष्ठावंतानी त्यांना मामा बनविले तर शिवसेनेला सुर्वण काळ उज्वल आहे.
भाजपाला येथे आपले कमळ फुलवायचे होते मात्र येथे ही शिवसेनेची एकला चलोरे ची भुमिका आणि कमळ फुलवायचे म्हटले तर त्याला खतपाणी घालायचे कोणी हा प्रश्न आहेच.
त्यांच्या विरोधात केंद्रात व राज्यात सत्तेच सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे यांच्या पक्षाच्या सुर्वणा खताळ या उभ्या असल्याने संगमनेर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा पदाच्या खुर्चीवर नेमके कोण विराजमान होणार.
जिल्ह्यात ज्या काही नगरपालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जातात त्यात संगमनेर नगर पालिकेचा सामावेश होतो
या पालिकेत गेली अनेक वर्ष थोरात कुटुंबाचे निवार्दीत वर्चस्व होते मात्र संगमनेर मध्ये विधान संभेला शिवसेनेचे अमोल खताळ धनुष्यबाण घेऊन आमदार झाले अण माजी मंत्री काॅगेस नेते बाळासाहेब थोरात यांना पराभव पत्कारावा लागला महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून थोरात यांच्या कडे पाहीले जात होते.
आणि या पराभवातुन थोरात अद्याप ही सावरलेले दिसत नाहीत तस असत तर त्यांनी सेवा समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवली नसती जे काय होईल ते पाहून घेऊ निवडणूक काॅगेस चिन्हावर लढु मात्र तसे काही त्यांनी न करता भाचे बुवाचा हट्ट पूर्ण केला.
एके काळी जिल्ह्यातील निवडणूकीत काॅगेस नेते म्हणून थोरात यांचा पक्षाच्या बॅनर्स वर छायाचित्र असायचे आता कदाचित संगमनेर मध्ये थोरात यांचे छायाचित्र असेल देखील मात्र काॅगेस चा हात नसेल
विरोधकांना चकवा देण्या साठी हा निर्णय घेतला असावा मात्र येथून काॅगेस पंजा गायब झाला आहे किवा आमदार सत्यजित तांबे पदविधर निवडणूकीत काॅगेस च्या पंजावर उमेदवारी न करता अपक्ष अण तेही भाजपाच्या पाठिंब्यावर आमदार झाले असल्याने येथे नगराध्यक्षा पदाचे उमेदवार मैथिली तांबे यांना विरोधकांचे मते मिळतील असा राजकीय डाव असावा एक मात्र नक्कीच दिवंगत माजी आमदार भाऊसाहेब थोरात यांचा या मतदार संघात मोठा प्रभाव होता त्यांच्या निधना नंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात जास्त काळ टिकवू शकले नाहीत जेव्हा काॅगेस व राष्ट्रवादी विभक्त झाल्या तेव्हा बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी सोबत जायला निघाले होते नव्हे नव्हे मुंबई च्या प्रवासातून दिवंगत नेते भाऊसाहेबांनी वडीलकीच्या सल्याने माघारी बोलवले व नंतर मात्र बाळासाहेब पहिल्यांदा पाटबंधारे राज्यमंत्री झाले दिवंगत मुख्यभंत्री विलासराव देशमुख यांच्या बरोबर टुनिग इतके जुळले की बाळासाहेब महसुल, शिक्षण, कृषी अशा दमदार खात्याचे कॅबिनेट मंत्री पद भुषविले
संगमनेर मध्ये आज जो काही सुबत्ता आली त्याला थोरात कुटुंबियाचे योगदान कोनी नाकारु शकनार नाही आज ही संगमनेर बाकी तालुक्या पेक्षा वरचड आहे सगळे शासकीय कार्यालये सुसज्ज तर बसस्थानकावर सोन्याचे दुकाने असनारे संगमनेर महाराष्ट्रातील माॅडेल बसस्थानक असावे संगमनेर मधील उद्योग व्यावसाय बहरला, दुधाने धवक्राती केली राजहंस गावो गावी पोहचले शिक्षण संस्था वैद्यकीय शिक्षण सारे काही असताना संगमनेर मध्ये धनुष्यबाणाने हात घायळ केला व आता नगरपालिका निवडणुकीत हात गायब करून टाकला
शिवसेनेच्या उमेदवार सुर्वणा खताळ यांच्या साठी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली सध्या भाजपा व शिवसेना शिंदे याच्यात सत्तेचे शित युध्द कितीही नाही म्हटले तरी पहायला मिळते
घराणेशाहीचा आरोप करुन आमदार अमोल खताळ आमदारकी मिळवण्यात यशस्वी झाले मात्र नगरपालिका निवडणूकीत त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली.
तेव्हा संगमनेर मध्ये शिवसेना व सेवा समिती यांनी नगराध्यक्षा पदा साठी उभ्या केलेल्या मैथिली तांबे व सुवर्णा खताळ यांच्या पैकी मतदार कोणाला नगराध्यक्षा पदाच्या खुर्चीवर बसवणार
माजी मंत्री बाळासाहेब थोराता वरील संगमनेर कराचा राग शांत करण्यात ते यशस्वी होणार की नाही हे या निवडणुकीतुन स्पष्ट होईल.
एकदम एकतर्फी लिखाण केले राजे...!
ReplyDelete