जिल्हा सहकारी बॅकेच्या अध्यक्ष चंद्रशेखर घुले

घाडगे न्यूज | प्रतिनिधी 
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष  माजी आमदार चंद्रशेखर भारुती  घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे 
चंद्रशेखर घुले हे दिवंगत माजी आमदार व बॅकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर घुले यांची निवड झाली असून घुले हे राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे असून  दिवंगत माजी आमदार मारुती घुले यांचे चिरंजीव असून 
 कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांचे सासरे आहेत 
यामुळे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी बॅकेचे अध्यक्ष पद भुषवताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिटो वापरत बॅकेचे अध्यक्ष पद माजी अध्यक्ष शेळके यांच्या निधनानंतर झालेल्या रिक्त जागेवर अध्यक्ष झाले होते दिवंगत माजी अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या कालावधीत बॅकेत मोठी कर्मचारी भरती झाली व मोठ्या प्रमाणात बॅकेत संगणक तसेचे फर्निचर खरेदी करण्यात आले होते माजी आमदार शिवाजी कर्डिले हे कोणत्याच साखर कारखान्याचे अध्यक्ष नव्हते मात्र त्यांचा जिल्हातील साखर कारखान्यावर बॅके मार्फत वचक ठेवून होते 
सहकारी क्षेत्रातील जाणकार आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर घुले पाटील हे यापूर्वीही बँकेच्या कारभारात सक्रिय राहिले आहेत. आज झालेल्या विशेष बैठकीत अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि त्यांची निवड बिनविरोध झाली. बँकेसमोरील आव्हाने, शेतकऱ्यांचे हित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण यावर घुले  यांच्या नेतृत्वाखाली विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

घुले  यांच्या बिनविरोध निवडीनंतर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 
सहा महिन्या नंतर जिल्हा सहकारी बॅकेची निवडणूक होणार असून सहा महिन्या साठी घुले बॅकेचे अध्यक्ष असणार आहेत 



Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन