नगराध्यक्ष खुर्चीवर कोण

नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसणार 
चर्चा @शिवाजी घाडगे 
देवळाली प्रवरा शहराचा नगराध्यक्ष कोण होणार, याचा निकाल आज दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. प्रशासनाने निकाल जाहीर करण्याची सर्व तयारी पूर्ण केली असून,  निवडणुक पुढे ढकलण्यात आल्यामुळे  निकालाची  उत्सुकता शिगेला पोहचली 
देवळाली प्रवरा येथे भाजपाचे सत्यजित कदम आणि काँग्रेसचे कृष्णा मुसमाडे यांच्यात नगराध्यक्षपदासाठी थेट लढत दिसून आली 
येथे पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘हात’ बाजी मारणार,हे आता काही तासात उघड होईल
दरम्यान, राहुरीतही  नगराध्यक्षपदा करीता विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे आणि भाजपाचे सुनील पवार यांच्यात लढत आहे. येथे ‘कमळाला छत्रीच्या काड्यांचा सामना करावा लागणार का?’ अशी चर्चा रंगली आहे.
आता अवघ्या काही तासांत देवळाली प्रवरा आणि राहुरी या दोन्ही शहरांना नवे नगराध्यक्ष कोण मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर