एक आदानी बाकी आडानी

एक अदानी, बाकी आडाणी
भाष्य घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे 
उद्योग क्षेत्रातील नामवंत गौतम अदानी अलिकडेच बारामतीत येऊन गेले आणि खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. मागे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येऊन गेले होते. मग तेव्हाच खासदार सुप्रिया सुळे मंत्रिमंडळात गेल्या असत्या. मुळात लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांनी अतिशय बिकट परिस्थितीत आघाडीचे खासदार निवडून आणले. अनेक जण खासदार होऊन गेले. मुळात उद्योग येत-जात असतात; याचा थेट संबंध मंत्रिमंडळात स्थान मिळण्याशी जोडणे कसे शक्य आहे? तसे राजकारणात अशक्य असे काही नसते. तसे खासदार सुप्रिया सुळे मंत्री झाल्या तर ते चांगलेच. कारण खासदार निलेश लंके काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकले व काढले गेले. त्या छायाचित्रात खासदार सुप्रिया सुळे देखील हसताना दिसत होत्या.
खा. शरद पवार… भल्याभल्यांना न उलगडणारं कोडं…  त्याच्या पुढे ए आय तंत्रज्ञान कदाचित फिके पडेल 
कारण उद्योगपती गौतम अदानी बारामतीत आले आणि भल्याभल्यांची नीती गुंग झाली. तसे अनेक उद्योगपती ऐन-केन कारणासाठी बारामतीत येऊन गेले आहेत. २०१४ च्या सुरुवातीला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले, तेव्हा अदानी यांची भूमिका महत्त्वाची होती, हे सगळ्यांनी पाहिले. नंतर अनिल अंबानी यांनीही मदत केली; ती मात्र कोणाच्या मध्यस्थीने झाली, हे लपून राहिले नाही.
मागील ३० वर्षांपासून त्यांना ओळखतो आणि कोणाशीही त्यांची तुलना होऊ शकत नाही. पवार यांना सगळ्या गोष्टींची माहिती तर असतेच, पण त्याही पलीकडे त्यांचं असलेलं ज्ञान, प्रभाव आणि संवेदनशीलता… या गोष्टी तुमच्या मनावर कोरल्या जातात आणि म्हणूनच  शरद पवार यांना आपण गुरू मानतो,” असे गौरवोद्गार गौतम अदानी काढले. 
अदानी यांनी खा शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. हा कार्यक्रम कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत असला, तरी महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर जाणार का 
सारे पवार कुटुंब एकत्र आलं…
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबातही चांगली फूट पडली होती. पक्षात पडलेली फूट निवडणुकांमध्ये आणि कुटुंबातील फूट सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ठळकपणे दिसत होती. 
उपमूख्यमंत्री अजीत पवार  रयतेच्या कार्यक्रम खा शरद पवार अशाळ नजरेने पाहत असल्याचे राज्याने पाहीले 
अनेक कार्यक्रमांत अजित पवार हे काका शरद पवार यांच्या जवळपास बसत नव्हते, कार्यक्रम संपताच काकांची नजर चुकवून व्यासपीठावरून मागून निघून जायचे आणि जाहीर भाषणांतून पवार यांच्यावर निशाणाही साधायचे. कदाचित कुणा देवा भाऊला खुष करण्या साठी ते हे करत असतील 
 आमदार रोहीत पवार आणि युगेंद्र पवार हे पुतणेही अजितदादांच्या विरोधात बोलायचे  लोकसभा निवडणुकीत  खा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित दादांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर रोहित आणि युगेंद्र यांनी  मतदारसंघ पिंजून काढत त्यांच्या विरोधात रान पेटवलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी थेट दादांच्या विरोधात बारामतीतून निवडणूक लढवत उघड आव्हान दिलं.
या घडामोडींमुळे पवार कुटुंबातील संबंध ताणले गेले होते. मात्र बारामतीत वेगळंच चित्र पाहायला मिळालं. गौतम अदानी यांनी जणू जादू केली आणि अख्खं कुटुंब एकत्र दिसलं. अदानी यांच्या स्वागताला रोहित पवार पोहोचले. त्यानंतर याच रोहित पवार यांनी चक्क अजितदादांच्या गाडीचं सारथ्य केलं. काकांच्या गाडीत पुतण्या ड्रायव्हिंग सीटवर दिसला, तर युगेंद्र पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
कदाचित खासदार सुप्रिया सुळे मंत्री होतील अथवा नाही, मात्र पवार कुटुंब एकत्र आलं, हे बरे झालं. काका-पुतण्यातील दुरावा कमी झाल्याचं चित्र दिसलं.
पक्षातील फुटीनंतर जाहीर कार्यक्रमांत काकांसोबत नजरानजर टाळणारे अजित पवार अनेकांनी पाहिले असतील. मात्र बारामतीत काकांच्या शेजारील खुर्चीवर बसून संवाद साधणारे अजित पवार दिसले. शरद पवार यांनीही यावेळी अजितदादांशी कानगोष्टी केल्या. काका-पुतण्यातील अंतर आता कमी होईल का?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हे उद्योगपतींचं सरकार आहे. गौतम अदानींसारख्या उद्योगपतींना सगळी कामं देऊन मोदी देश लुटत आहेत,” असा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते  खा राहुल गांधी  करत असतात. त्यामुळे इंडिया आघाडीचे समर्थक अदानींकडे ‘व्हिलन’ म्हणून पाहतात. 
मुळात गुजरातमधील गोध्रा घटनेच्या वेळी देशाचे संरक्षण मंत्री शरद पवार होते.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन