मेडल्सचा बादशहा रायडिंगचा पाटील शरद काळे पाटील

 मेडल्सचा बादशहा : रायडिंगचा पाटील शरद काळे  पाटील 
साहस।शिवाजी घाडगे 
अहिल्यानगर येथील साहस, वेग आणि जिद्दीच्या जोरावर मोटारसायकल रेसिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अहिल्यानगरचे शरद काळे पाटील हे आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या  भेटी दरम्यान कार्यालयाच्या भिंतींवर झळकणाऱ्या विविध स्पर्धांतील विजयाची खुन मिरवणाऱ्या मेडल्स आणि सन्मानचिन्हांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. प्रत्येक मेडलमागे संघर्ष, मेहनत आणि धाडसाची एक वेगळी कहाणी दडलेली असल्याचे जाणवत होते.
दुचाकी रेसिंग हा अत्यंत धोकादायक आणि साहसी क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र, शरद काळे पाटील यांनी आपल्या कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. देशातील विविध भागांत आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रेसिंग स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेत अनेक पदके पटकावली आहेत. त्यामुळे त्यांना “मेडल्सचा बादशहा” अशी ओळख मिळाली आहे.
शरद काळे पाटील यांच्या वेगाबाबत ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अवघ्या १ तास २० मिनिटांत मोटारसायकलवरून पुणे गाठल्याचा त्यांचा अनुभव अनेकांना थक्क करून सोडतो. त्यांच्या या वेगवान प्रवासामुळे साहसाची रोमांचक अनुभूती मिळते, तर दुसरीकडे काळजाचाही थरकाप उडतो.
रेसिंगच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली आहे. विविध राज्यांतील स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी अनेक नामांकित रेसर्ससोबत स्पर्धा केली. या प्रवासात त्यांना अनेक अनुभव मिळाले असून, मोटारसायकल रेसिंगकडे तरुणांनी सुरक्षिततेची काळजी घेत सकारात्मक दृष्टीने पाहावे, असा संदेशही ते देतात.
आज शरद काळे  पाटील यांचे नाव केवळ रेसिंगपुरते मर्यादित राहिले नसून, जिद्द आणि साहसाचे प्रतीक म्हणूनही घेतले जाते. त्यांच्या कार्यालयातील मेडल्सची चमक ही त्यांच्या अथक परिश्रमांची आणि वेगावरील प्रेमाची साक्ष देणारी ठरत आहे.
मोटारसायकल वरील साहसी विक्रमवीर शरद काळे पाटील यांनी आपल्या जिद्दी, चिकाटी आणि धाडसाच्या जोरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रमांची नोंद करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. वयाच्या ६१ व्या वर्षीदेखील ते तितक्याच उत्साहाने आणि जोमाने साहसी रायडिंग करत असून, तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या शरद काळे पाटील  यांनी मोटारसायकल रायडिंगमधील साहसी विक्रमांच्या माध्यमातून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक मानाचे किताब पटकावले आहेत.
पुणे बेंगलोर पुणे असे 1600 किमी अंतर त्यांनी 20 तासात पार केले व पुणे चेन्नई पुणे हे 2400 किमी अंतर त्यांनी फक्त 30 तासात पार केले. त्याबद्दल त्यांना वर्ल्ड टफेस्ट रायडर या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. 
 शरद काळे पाटील यांनी समृध्दी महामार्गावरून संभाजीनगर ते नागपूर हे अंतरअवघ्या  तीन तासाच्या आत पार करून दाखवले आहे. 
अष्टविनायक यात्रा फक्त बारा तास आणि बारा मिनिटात पूर्ण करण्याचा त्यांचा विक्रम आहे.  राज्यातील साडेतीन शक्तीपीठ त्यांनी मोटरसायकलवर फक्त 24 तासात पूर्ण करून दाखवले आहे. 
काळे पाटील यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया  व लिंका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले गेले आहेत. मुंबई–दिल्ली–कोलकाता–चेन्नई–मुंबई असा सुमारे सहा हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी अवघ्या ८८ तासांत पूर्ण करत विक्रम प्रस्थापित केला. या पराक्रमाबद्दल त्यांना “वर्ल्ड्स टफेस्ट रायडर” या किताबाने गौरविण्यात आले. दिवंगत 
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पत्र पाठवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. तसेच दिवंगत उद्योगपती रतन टाटा 
 यांनीदेखील त्यांच्या साहसी कामगिरीबद्दल अभिनंदन केले होते.
अष्टविनायक दर्शनातून मिळाला आत्मविश्वास
शरद काळे पाटील यांनी सुरुवातीच्या काळात कोणालाही न सांगता अवघ्या १३ तासांत अष्टविनायक दर्शन पूर्ण केले होते. या प्रवासामुळे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी १२ तास १२ मिनिटांत ५३९ किलोमीटरचा अष्टविनायक प्रवास पूर्ण करून विक्रम केला. या कामगिरीबद्दल त्यांना पिंपरी-चिंचवड देवस्थानतर्फे “मोरया  पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर नगर–कोल्हापूर–नगर, नगर–हैदराबाद–नगर अशा विविध लांब पल्ल्याच्या रायडिंग मोहिमा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. बंगळुरू–पुणे हे सुमारे १६०० किलोमीटर अंतर त्यांनी केवळ २० तासांत पार केले. या कामगिरीनंतर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला.
“आयनमॅन” किताबाचे लक्ष्य
सध्या शरद काळे  यांचे पुढील लक्ष्य प्रतिष्ठेचा “आयनमॅन” किताब मिळविण्याचे आहे. 
“भारत जोडो”चा संदेश देणारी रायडिंग मोहीम
शरद काळे  यांनी आगामी काळात लेह ते कन्याकुमारी असा सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय ३० दिवसांत भारतातील २० राज्यांमधून रायडिंग करत “भारत जोडो” आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्याचाही त्यांचा मानस आहे. दररोज एका राज्यातून प्रवास करत युवकांमध्ये साहस, शिस्त आणि देशप्रेम जागविण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
कठोर सराव आणि शिस्त आवश्यक
मोटारसायकल रायडिंगमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर सराव, योग्य आहार आणि मानसिक तयारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे शरद काळे पाटील सांगतात. “वय हा फक्त आकडा असतो. जिद्द आणि स्पष्ट ध्येय असेल तर कोणतेही आव्हान पेलता येते,” असे ते म्हणाले.
त्यांच्या मते, भारतात साहसी खेळांना अजूनही अपेक्षित प्रोत्साहन मिळत नाही. सरकार, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी अशा साहसी खेळाडूंना मदत केल्यास भारतीय युवक जागतिक स्तरावर मोठे विक्रम करू शकतात.
बालपणापासून रायडिंगची आवड
शरद काळे  यांचे शालेय शिक्षण प्रवरानगर परिसरात झाले. त्यांनी प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना मोटारसायकल रायडिंगची आवड होती. त्यांच्या वडिलांचे शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व आणि आईची समाजसेवेची वृत्ती यांचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला.
आजही ते तरुणांमध्ये साहस, आत्मविश्वास आणि देशासाठी काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे काम  केले आहे.
 

Comments

  1. Congratulations Sharad. Your achievements are really comandable. You have made your district proud. Keep it up,above and beyond.

    ReplyDelete
  2. Congratulations Dear Sharad, Proud to Be associated with You, Since YOU were Studying at प्रवरा Polytechnic and I was HOD Civil There....
    Coincidentally His Son Rohit is Also My student at Government Polytechnic Awasari, where I Was Principal for 4Years

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर