साहित्य ,संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
साहित्य, संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घाडगे न्यूज। प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे प्रेरणास्थान असून, ग्रामविकासाचा आदर्श नमुना म्हणून ‘प्रवरा मॉडेल’ची देशभरात ओळख निर्माण झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ऐतिहासिक कार्य सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी केले. त्यांनी उभा केलेला हा विचार आणि वारसा पुढे नेत सहकार चळवळीला साहित्य, कला आणि संस्कृतीची जोड देऊन ती अधिक समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी केले. प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव, प्रबोधन आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, ...