राहुरी विधानसभा से पोटनिवडणूक साठी जाहीर प्रसिध्दी पूर्व मंजुरी आवश्यक

 राहुरी पोटनिवडणूक साठी राजकीय जाहिरातींसाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक 
प्रतिनिधी-
राहुरी विधान संभा पोट निवडणूक साठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे, केबल नेटवर्क, सोशल मीडिया तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर राजकीय जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण समितीची पूर्व मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मुद्रित माध्यमांमध्येही मतदानाच्या दिवशी व त्याच्या आधीच्या कालावधीत जाहिरातींसाठी विशेष नियम लागू असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली.

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण समिती सदस्य व माध्यम कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या  प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे, आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे,  पत्रकार तथा समिती सदस्य महेश देशपांडे, पोलीस निरीक्षक सुदाम काकडे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, माहिती अधिकारी अमोल महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित 

फेक न्यूज व द्वेषपूर्ण भाषणांवर त्वरित कारवाई करण्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंगचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मतदानाच्या ४८ तास आधी लागू होणाऱ्या शांतता कालावधीत प्रचारबंदी, एक्झिट पोलवरील निर्बंध व माध्यमांनी पाळावयाच्या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदान व मतमोजणी दिवशी गोपनीयता राखणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व निष्पक्षता राखण्यासाठी माध्यमांचे प्रभावी नियमन आवश्यक असून माध्यम कक्षामार्फत पत्रकारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. आगामी पोटनिवडणुकीत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होऊन मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यास या प्रशिक्षणामुळे मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर