त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द

त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे 

अहिल्यानगर  - जिल्हा पोलीस दलातील निलंबित करण्यात आलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना
 निलंबनातून मुक्त करून पुन्हा सेवेत रुजू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जारी केले आहेत. संबंधितांच्या प्रकरणाचे पुनर्विलोकन करण्यात येऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
निलंबनातून मुक्त करण्यात आलेल्या या अधिकारी-अंमलदारांची संगमनेर शहर, कर्जत, शिर्डी शहर वाहतूक शाखा आणि अकोले पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांना २७ जून रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना आता निलंबनातून मुक्त करून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना २३ जून रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांची कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

अंमलदार बाळासाहेब राठोड यांना १९ जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना निलंबनातून मुक्त केल्यानंतर शिर्डी शहर वाहतूक शाखेत नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांना १३ जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना आता निलंबनातून मुक्त करून त्यांची अकोले पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित अधिकारी व अंमलदारांवर प्रलंबित असलेल्या खातेनिहाय शिस्तभंगविषयक कारवाईच्या अधीन राहून त्यांना निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार