देवळाली प्रवरात विवाहीत महिला दोन लेकरांसह मृतावस्थेत आत्महत्या की हत्या?

देवळाली प्रवरा येथे विवाहित महिला दोन लेकरांसह मृतावस्थेत; आत्महत्या की हत्या?

राहुरी फॅक्टरी। प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथे एका विवाहित महिलेचा तिच्या दोन चिमुकल्या मुलांसह राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवरी रात्री आठच्या सुमारास वंदना गणेश गाढे (वय ३५), चैतन्य गणेश गाढे (वय ७) आणि जीवन गणेश गाढे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.
ही घटना  रात्री घडल्याचे समजते. तिघेही राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात/हत्या याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, पंचनामा तसेच अन्य आवश्यक तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, एकाच कुटुंबातील आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने देवळाली प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
वंदना गिरणी तुन आली असल्याचे परिसरातील रहिवाशांनी पाहीले 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार