Posts

दुष्काळात कर वसुलीत स्थगिती दया-काॅगेस

Image
दुष्काळात घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीला तात्पुरती स्थगिती द्या देवळाली प्रवरा । प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीस तात्पुरती स्थगिती द्यावी, तसेच विविध आवश्यक दाखले देताना घरपट्टी-पाणीपट्टी भरल्याचा ‘नील दाखला’ अथवा थकबाकी नसल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती करू नये, अशी मागणी काॅगेस चे गटनेथे तुकाराम उर्फ दासू पठारे,नगसेविका सुनिता थोरात,काॅगेस नेते वैभव गिरमे,अनिल चव्हाण,सुनील विश्वासराव, आदी उपस्थित होते देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दुष्काळाचा परिणाम शेतीबरोबरच शहरातील व्यवसाय, रोजगार आणि नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवरही होत आहे. अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची वसुली केल्यास नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा विचार करून नागरिकांना कर वसुलीत तात्पुरता दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. दुष्काळामुळे ग्रामीण अ...

राहुरी तालुक्यातील ऊस दुसरीकडे जातोय वेदनादायक

Image
ऊस दुसरीकडे जातोय, पण वेदना तनपुरे कारखान्याच्या गेटवरच आहेत! वेदना।शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा परिसरातील रस्त्यावरून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर दौंडच्या दिशेने जातो. ट्रॅक्टरवर ऊस आहे, चालकाच्या चेहऱ्यावर कष्ट आहेत; पण मनात मात्र एक वेगळीच खंत आहे. कारण हा ऊस परक्या कारखान्यात गाळपासाठी जात आहे. ज्या मातीत हा ऊस पिकला, त्या परिसरातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर हा ऊस का जाऊ शकत नाही? हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्याचा नाही, तर संपूर्ण परिसराच्या मनातील प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद आहे. परिणामी देवळाली प्रवरा आणि परिसरातील शेतकऱ्यांना आपला ऊस दूरवरच्या कारखान्यांकडे पाठवावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांपासून दौंडच्या कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या चालक ताराचंद यांच्या शब्दांतून या वेदनेची तीव्रता जाणवते—“आपला ऊस दुसरीकडे नेताना मनाला वेदना होतात.” ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही. त्यामागे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आहे. ऊस वाहतुकीचा खर्च, ट्रॅक्टरचे भाडे, डिझेलचा वाढता खर्च, लांबच्या कारखान्यापर्यंतची वाहतूक आणि त्यात दुष्काळ...

देवळाली प्रवरात विवाहीत महिला दोन लेकरांसह मृतावस्थेत आत्महत्या की हत्या?

Image
देवळाली प्रवरा येथे विवाहित महिला दोन लेकरांसह मृतावस्थेत; आत्महत्या की हत्या? राहुरी फॅक्टरी। प्रतिनिधी देवळाली प्रवरा येथे एका विवाहित महिलेचा तिच्या दोन चिमुकल्या मुलांसह राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवरी रात्री आठच्या सुमारास वंदना गणेश गाढे (वय ३५), चैतन्य गणेश गाढे (वय ७) आणि जीवन गणेश गाढे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना  रात्री घडल्याचे समजते. तिघेही राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात/हत्या याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, पंचनामा तसेच अन्य आवश्यक तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने देवळाली प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वंदना गिरणी तुन आली ...

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी सप्ताह निमित्त ग्रंथप्रदर्शन आयोजन

Image
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शन अहिल्यानगर । प्रतिनिधी जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार योगेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार  नागेश गायकवाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषेचे वैभव जपणे, भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख नागरिकांना करून देणे तसेच मराठी भाषेबाबतच्या संशोधनाविषयी जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी का...

विश्वासात न घेतल्याची नाराजी पण विश्वासाचे राजकारण कुठे?

Image
विश्वासात न घेतल्याची नाराजी; पण विश्वासाचे राजकारण कुठे? भाष्य।शिवाजी घाडगे  ‘मिले सूर मेरा, तुम्हारा तो...’ म्हणत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे सूर जुळवण्याचा प्रयत्न सुरू असताना प्रत्येक नेत्याला आपला सूर महत्त्वाचा वाटत आहे. मात्र सहकाराच्या राजकारणात ‘मला विचारले का नाही?’ या प्रश्नापेक्षा ‘सर्वांना सोबत घेऊन निर्णय झाला का?’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सध्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीला विरोध नाही, मात्र सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाला पाहिजे, असा सूर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार नीलेश लंके यांच्यानंतर आता खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही लावला आहे. संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना खासदार वाकचौरे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगितले. मात्र, संगमनेर येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेला डावलण्यात आल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. निवडणूक प्र...

मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज :अमोल इथापे

Image
मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज : अमोल इथापे । प्रतिनिधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात अहिल्यानगर जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहे. सुमारे ७०० वर्षांपूर्वी नेवासा येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तसेच महिमभट, चक्रधर स्वामी यांच्यासह अनेक संत, साहित्यिक आणि विचारवंतांनी मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी महान कार्य केले आहे. मराठी भाषा ही मराठी माणसाच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे प्रतीक असून, या भाषेत साहित्याचा अनमोल ठेवा आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल तथा ग्रंथमित्र अमोल इथापे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित **‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’**निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अहिल्यानगर जिल्ह्यातील साहित्यिकांनी लिहिलेल्या ग्रंथांचे ‘साहित्यिक रत्न’ या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी इथा...

प्रसाद नगरच्या जागेचा प्रश्न सोडणण्या साठ केंद्रीय मंत्री ना आठवले यांची भेट

Image
प्रसादनगरचा जागेचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट अहिल्यानगर, दि. २ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी) : देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रसादनगर येथील गट क्रमांक ५४२ मधील ४१७ आर जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता केंद्र सरकारच्या दारात पोहोचला आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे २५०  कुटुंबे रहीवास वास्तव्यास असून, या कुटुंबांना पक्की घरे व हक्काची जागा मिळावी, यासाठी नगरसेविका  पल्लवी वैभव ढूस यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेत विनंती केली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले अहिल्यानगर दौऱ्यावर आले असता अहिल्यानगर येथील भेटीत प्रसादनगर येथील नागरिकांसाठी केंद्र सरकारची PMAY-U 2.0 योजना मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली. आप्पासाहेब ढूस यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादनगर येथील गट ...