डाॅ भाकरे अधिष्टाता
डॉ. बापूसाहेब भाकरे यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे यांना अधिष्ठाता (कृषी) या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. डॉ. भाकरे यांनी 1999 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून मृद विज्ञान या विषयातील पीएच डी ची पदवी संपादन केली आहे. कृषी विद्यापीठातील त्यांना विविध पदांचा 38 वर्षाचा अनुभव असून त्यांनी नियंत्रक तसेच पदवीत्तर महाविद्यालयाचे सहयोगीअधिष्ठाता म्हणून अतिरिक्त पदभार सांभाळलेला आहे. त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय परिसंवाद, पाच राष्ट्रीय परिसंवाद व दोन राज्यस्तरीय परिसंवादाचे संयोजन सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आतापर्यंत 19 एम. एस. सी. कृषी आणि पाच आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. राज्यस्तरीय तसेच विविध केंद्रीय समित्यांवर सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांचे आतापर्यंत 142 शास्त्रीय लेख विविध शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून 31 पुस्तके तसेच पुस्तकातील अध्याय प्रकाशित...