स्मशान भुमिला जागा दान दात्याचा सत्कार

सत्कार

*सत्कार दातृत्वाचा @पत्रकार शिवाजी घाडगे 

स्मशान भुमी साठी अर्धा एकर जमीन दान दिलेले श्रीकृष्णलाल संतराम मेंद्रु यांचा स्नेह नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  ते देखील त्यांनी दान दिलेल्या निर्मल कृष्ण वैकृठधाम मध्ये आज पर्यत सह सह कोणाचा सत्कार स्मशान भुमीत होत नाही मात्र याचे भाग्य किसन शेठ यांना लाभले 

समाज्यात दाण करणारयाची संख्या कमी नाही जो तो आपआपल्या परीने दान देत असतो मात्र स्मशान भुमि साठी 21 गुठे आपली जागा दान करुन नव्या पिढीला दिप स्तभ ठणारे राहुरी फॅक्टरी येथिल जुण्या पिढीतील जेष्ठ व्यापारी किसन शेठ मेंद्रु याचा स्नेह सत्कार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा आर्दशचे चेअरमन विष्णु गिते, सुनिल विश्वासराव ,आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे,आनंद ॠषी चे ललित चोरडीया, राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे,

व्यापारी कांतीलाल लोंढा (गादीवाले काका) ,पत्रकार शिवाजी घाडगे,शांतीचौकाचे दिपक त्रिभुवन,वैभव गिरमे ,प्रदिप गरड,ज्ञानेश्वर वाणी ,किशोर थोरात , भास्कर कोळसे,बाबा कणसे, विजय विजन ,सचिन वाघमारे,रफिक सय्यद , आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

 देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील राहुरी फॅ शहर आता शहर का म्हणायचे तर नगर पालिका आहे म्हणुन तसे  शहरात सारखे येथे काही नाही मात्र नगर मनमाड राज्य मार्गावरील असल्या मुळे सतत वर्दळ एक सहकारी साखर कारखाना तो कधी चालु तर कधी बंद असतो पुर्वी राहुरी फॅक्टरीला एक वेगळाच वैभव होते आता व्यावसायिक बाजार पेठेवर परिणाम झाला मात्र निवासस्थान म्हणून नागरिक येथे राहायला महत्त्व देतात लोकसंख्या वाढते तशी राहुरी फॅक्टरी वाढते आहे आपल्या जवळपास स्मशान भुमी असावी असे कोणाला वाटत नसते मात्र स्मशान भुमी शहरात वर्दळीत असली म्हणजे स्मशान वैराग्य येत नाही 

दिवंगत नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण जनतेतील पहिले नगराध्यक्ष असताना किसन शेठ यांनी आपली जागा देवळाली नगरपालिकेला दान दिली आता या स्मशान भुमी ईतकी सुंदर झाली आहे की गुरुवारी किसन शेठ यांचा सत्कार समारंभ येथे झाला येरवी लोक येथे रडत असतात आज हसत होते अनेकांनी किसन शेठ यांच्या अनुभव कथन केले आज त्यांचे वय 88 वर्ष आहे या वयात  त्यांनी दिलेल्या स्मशान भुमी जागे बद्दल परिसरातील नागरिक याच देही याच ठिकाणी उतराई झाले आणि आपले दान सदप्रात्री झाल्याची खात्री झाली 

 नागरी सत्कार किसन शेठ यांचा करण्यात आला अल्प उपोहार घेऊन नागरिकांनी एक दिवस आपला शेवट येथेच होणार याची जाणीव घेत चालते झाले 

*कोण काय म्हणाले* 

*ललित चोरडीया-  आपल्याला व बधुला पोलीस सायकलवर डबल स्टिट पकडले तेव्हा सोडविलशिवाजी कपाळे- पहिल्या पासुन धाडसी व्यक्तीमत्व लोक कल्याणाची हौस

*विष्णु गिते - व्यावसायकाना विज पुरवठा व्हावा म्हणून आदोलन 

 परिसरातील मोठा नावलौकिक व्यावसायातुन मिळवला 

*शिवाजी घाडगे- नव्या पिढीला दिप स्तभ दान करण्या साठी दानत लागते लोक फुटा फुटावरु तोडतात येथे संगळ्याना यायचे ऐवढे धान्यात ठेवले तरी तरी आपण ध्यानावर राहतो 

 *किशोर थोरात-88 वर्ष वय हे चागल्या कामा मुळेच 

* रमेश मेंद्रु- त्यांनी स्मशान भुमीला जागा दान केल्याचा आनंद आहे कारण वैकुठ भुमिवर त्याचे नाव कोरले गेले 

* सुनिल विश्वासराव- किसन शेठ याचा सत्कार हा आवश्यक होता यापुढील काळात चांगले काम करण्यारया व्यापाऱ्यांचा सत्कार करणार वाईट रुढी विरोधात लढा उभारणे गरजेचे आहे 


Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन