कोळेवाडीतील विद्यार्थी साठी धडपड
कोळेवाडीतील मुले शिक्षणा साठी चांगदेवाची धडपड
प्रा चांगदेव वायळ यांनी केले वाचनालय सुरु तसेच गरीब विद्यार्थांना करतात मदत.
शिक्षण हा व्यक्तीचा तिसरा डोळा आहे
ज्ञान हे वाघीनीचे दुध आहे ज्याला प्यायला मिळते तो गुरकल्या शिवाय राहत नाहीत
शिक्षणाने व्यक्ती शहाणा बनतो
स्वावलंबी, व्यवाहारीक, स्वाभिमानी बनतो धैर्य, आत्मविश्वास व दुरदृष्टी त्याला शिक्षणामुळेच प्राप्त होते .
गावातील प्रत्येक गोरगरीबाच्या मुलाला देखील दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, गोरगरीबांच्या मुलांनी देखील मंथन, स्काॅलरशिप, नवोदय विद्यालय, सैनिकी स्कूल विद्यालय अशा स्पर्धात्मक परीक्षा देवून नवोदय विद्यालयात व सैनिक स्कूल विद्यालयात शिक्षण घ्यावे.
मंथन व स्काॅलरशिप परीक्षेत मेरीट मध्ये येवून या मुलांना देखील स्काॅलरशिप मिळाव्यात.
तसेच आपल्या गावातील गोरगरीबांच्या मुलांनी देखील प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी व्हावे, उद्योजक व्हावे, आय ए एस/ आय पी एस/वकील/ न्यायाधीश/डॉक्टर/प्राध्यापक/शास्त्रज्ञ होवून आपली व आपल्या आई वडिलांची सर्व स्वप्ने साकार करुन गावाचा व समाजाचा सर्वांगीण विकास साधावा म्हणून पाच वर्षांपुर्वीच कोळेवाडी गावात डॉ गोविंद गारे वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र हे डॉ चांगदेव वायळ यांनी सुरू केलेले आहे. त्या वाचनालयामध्ये MPSC, UPSC, Staff selection, Railway Recruitment, पोलिस भरती, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी इत्यादी पदांच्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी सर्व पुस्तके, नोट्स, संदर्भ ग्रंथ, मासिके हे ही डॉ चांगदेव वायळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत...
कोळेवाडीतील गोरगरीबांच्या मुला-मुलींनी देखील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देवून आपली व आपल्या आई-वडीलांच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्ने साकार करावीत असा उदात्त हेतू व उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि तसा ध्यास घेवून कार्य करणारे आपल्या कोळेवाडी गावातील एकमेव कृतिशील व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. चांगदेव वायळ हे होय...
गुरुवार दिनांक २६ जानेवारी, २०२३ या भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताकदिनी डॉ. चांगदेव वायळ यांनी जिल्हा परिषद शाळा, कोळेवाडी व आदिवासी आश्रम शाळा, कोळेवाडी या दोन्ही शाळेंना भेट देवून असे जाहिर केलेले होते की, या वर्षी म्हणजे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात जी मुले इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत आहेत. त्या मुलांची जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर येथे पुढील शिक्षणासाठी निवड होणेसाठी जी परीक्षा दिली जाते, त्या परीक्षेसाठी लागणारे सर्व साहित्य, पुस्तके, प्रश्नसंच, नवनीत, वही, पेन, पेन्शिल, शाॅपनर, खुडरबर असे सर्व साहित्य स्वतःच्या पैशाने उपलब्ध करुन देण्यात येईल...
दिलेल्या शब्दानूसार प्रा. डॉ. चांगदेव वायळ यांनी एक महिण्यापुर्वीच जिल्हा परिषद शाळा कोळेवाडी या शाळेत इ. ५ वी मध्ये शिकणा-या ६ मुले/मुलींना आणि आदिवासी आश्रम शाळा, कोळेवाडी येथे इ. ५ वी मध्ये शिकणाऱ्या २० मुले/मुलींना अशा एकूण २६ विद्यार्थ्यांना वरील सर्व साहित्याचे वाटप देखील केलेले असून त्याबाबतचे क्लास, अभ्यास, व गृहपाठ देखील त्या त्या शाळेतील शिक्षक घेत आहेत आणि मुले देखील या परीक्षेचा अभ्यास करत आहेत.
वरील सर्व साहित्यासाठी एकूण रुपये ९२४५ (रु. नऊ हजार दोनशे पंचेचाळीस) एवढा खर्च आलेला असून हा सर्व खर्च देखील डॉ. चांगदेव वायळ यांनी एकट्यानेच केलेला आहे. इतकेच नाही तर आपली कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर सलग तिन दिवस रोज संध्याकाळी सहा ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत काॅम्प्यूटर सेंटरला (सायबर कॅफे येथे) थांबून आदिवासी आश्रम शाळेतील २० मुलांचे आॅनलाईन अर्ज भरुन घेण्याचे काम देखील डॉ.चांगदेव वायळ यांनीच केलेले आहे...
या वर्षी नवोदय विद्यालयात नंबर लागावा म्हणून होणारी स्पर्धा परीक्षा ही २९ एप्रिल,२०२३ रोजी होणार असून त्या परीक्षेची हाॅल तिकीटे देखील आलेली आहेत. आणि परिक्षेच्या अगोदर मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः डॉ. चांगदेव वायळ हे चार-पाच दिवस वेळ देणार आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील व जिल्ह्यातील काही तज्ञ शिक्षक आणून मुलांचे विशेष क्लास देखील घेतले जाणार आहेत. जिल्हा षरीषदेच्या व आश्रम शाळेतील शिक्षकांबरोबरच कोळेवाडीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम आंबेकर यांनी मुलांचे क्लास घेत आहेत.
हे पहिलंच वर्ष असल्यामुळे मुलांना नवोदय विद्यालयाची परीक्षा दिले पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळा व आदिवासी आश्रम शाळा, कोळेवाडी या दोन्ही शाळेतील इ. ५ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय व सैनिक स्कूल या शाळेंमध्ये पुढील शिक्षणासाठी निवड व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व साहित्य हे जून या महिण्यामध्ये शाळा सुरु झाल्यापासूनच देण्यात येणार असून या परीक्षेंची तयारी व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील काही तज्ञ शिक्षक आणून विशेष क्लासेस देखील घेतले जाणार आहेत. या कार्यासाठी येणारा सर्व खर्च हा देखील डॉ चांगदेव वायळ हे स्वतःच करणार आहेत...
मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मी स्वतः सोपान वायळ, जयराम नंदकर साहेब, रावसाहेब कांबळे, सोन्याबापू आंबेकर सर, काळू वायळ सर, सुनिल वायळ, डॉ. सोमनाथ नंदकर, सुदाम कोकाटे साहेब, कैलास राहिंंज , कोळेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन शंकर लेंभे, चांगदेव लेंभे, चिमाजी कांबळे, छबुराव कोकाटे, जयवंत कांबळे, विकास लेंभे व कोळेवाडीतील सर्व नागरिक मनापासून स्वागत करत आहेत
Comments
Post a Comment