बेकरी उत्पादनात बॅन्ड करा विस्तार शिक्षण संचालक गोरक्ष ससाणे

बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा बॉन्ड निर्माण करावा
- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे

स्वंय रोजगारातुन रोजगाराची निर्मिती करुन मुल्यवर्धीत बेकरी पदार्थ समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध करुन द्यावेत. उत्कृष्ट प्रतीच्या कच्च्या मालाची निवड, गुणवत्ता बेकरी व्यवसाय स्वच्छता, पॅकींग आदी. बाबींवर विशेष भर दिल्यास बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा ब्रॅन्ड निर्माण करता येईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. 
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागात दि. 6 ते 10 जानेवारी, 2025 दरम्यान बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, डॉ. बाबासाहेब भिटे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना डॉ. विक्रम कड यांनी विभागामार्फत घेण्यात येणार्या प्रशिक्षण कार्यक्रमांची रुपरेषा व महत्व विषद केले. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना ब्रेड, बटर, खारी, टोस्ट, नानकटाई, लादीपाव, बनपाव, नाचणी बिस्कीट, क्रीमरोल व आयुर्वेदिक कुकिज हे बेकरी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन