वेळचे भान ठेवा- जिल्हिधिकारी डॉ.पंकज आशिया
नगरचे नुतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांलयतील कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन व नियोजना बाबद गार्भाय राखायला सागितले तर जनतेचे कामे वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला दिल्याने तालुका महसुल देखील अलर्ट झालेले पाहवयास मिळाले तर वाळु तस्करी होणार नाही यासाठी नदीतील मार्गावर वाहतूक अडथळे निर्माण करण्यास खड्डे खोदण्यास सुरुवात झाली आहे .
कार्यातील कर्मचारी हजेरी थम आठ दिवसात कार्यन्वित करण्याच्या सुचना दिल्या तर मीटिंगला वेळे आगोदर उपस्थित राहण्याची समज बजावली तसेच पंधरवडय़ात झालेल्या फाईल्स ची माहीती मागवली.
डॉ.आशिया हे आय ए एस असल्याने त्याचे काम देखील चांगले होईल अशी चर्चा रंगलीय कामाचा निपटारा करा लोकांना आनंदी ठेवा हे सुत्र नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे आहे शिस्त प्रिय स्वभावाने नागरिकांना आपलेसे केले तर कामचुकारपणा करणाराना धडकी भरली आहे मधाळ मराठी तर अधुन मधुन इंग्रजीत संभाष करणारे नवे जिल्हाधिकारी नगरचे 60 वे जिल्हाधिकारी आहेत.
डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
Comments
Post a Comment