त्रिंबकराज व्याख्यानमालेचे आयोजन

त्रिंबकराज व्याख्यानमालेचे आयोजन 

देवळाली प्रवरा नगरपरिषदच्या 
श्री त्रिंबकराज मोफत वाचनालय च्या वतीने  20 ते 22 मार्च रोजी तीन दिवसीय त्रिंबकराज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली असून या व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली. 
   गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी सहा वा. श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे अहिल्यानगर येथील ज्येष्ठ साहित्यिक, हास्य सम्राट फेम डॉ. संजय कळमकर यांचे "हसण्यासाठी जन्म आपुला" या विषयावर, शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी कोल्हापूर येथील युवा व्याख्याते युवराज पाटील यांचे "जीवन सुंदर आहे" या विषयावर व्याख्यान होणार आहे.
  22 मार्च रोजी पुणे येथील युवा साहित्यिक, व्याख्याते सचिन पवार यांचे " संतांनी महाराष्ट्राला काय दिले " या विषयावर व्याख्यान होणार असून याच दिवशी व्याख्यानमालेचा समारोप श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत जी ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. तरी या व्याख्यानमालेसाठी देवळाली प्रवरा परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, बचत गटातील सदस्य यांनी उपस्थित राहून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषदे च्या वतीने करण्यात आलेले आहे.
श्री त्रिंबकराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रथमताच अशा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले असून अभ्यास करणारे विद्यार्थी व नागरिकांना याचा निश्चितच उपयोग होणार आहे, यावेळी प्रत्येक दिवशी एक शालेय विद्यार्थी  आपले मनोगत व्यक्त करणार आहे. तसेच यावेळी त्रिंबकराज मोफत वाचनालयाचा लाभ घेऊन शासकीय नोकरीमध्ये यावर्षी निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन