ऑनलाईन विठ्ठल दर्शन बुकींग पास वेळ वाढवली

श्री विठ्ठल रुक्मिणी ऑनलाइन दर्शन पास बुकींगच्या संख्येत व वेळेत वाढ
    श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना ऑनलाईन पध्दतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून निशुल्क दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध असून, जास्तीत जास्त भाविकांना  श्री विठ्ठल रुक्मिणीचे सुखकर पददर्शन घेता यावे यासाठी ऑनलाइन दर्शन पास बुकींग संख्येत व वेळेत वाढ करण्यात आली असून या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर च्या अधिकृत संकेतस्थळावरून दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून, भक्तांना त्यांच्या इच्छित दिवशी आणि वेळेस मंदिरात पदस्पर्शदर्शन घेता येते, ज्यामुळे रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सण, यात्रा, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून स.7.00 ते रा.9.00 या वेळेत एकूण 6 स्लॉट निश्चित करून, प्रति स्लॉट 600 प्रमाणे दैनंदिन 3600 पासेस उपलब्ध असणार आहेत. याशिवाय, जास्तीत जास्त 10 दिवस अगोदर बुकींग करता येणार असून, पासेस शिल्लक राहिल्यास त्याच दिवशी तात्काळ बुकींग करता येईल. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत https://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाला भेट देऊन,  मुख्य पृष्ठावर " Pass Booking" या लिंकवर क्लिक करा, बुकिंग फॉर्म भरा, बुकिंग तारीख निवडा, माहिती भरा, फोटो अपलोड करा, बुकिंग पूर्ण करा, पास डाउनलोड व प्रिंट करा, बुकींग तारखेच्या दिवशी मंदिर परिसरातील श्री संत तुकाराम भवन येथे 15 मिनिटे अगोदर भेट द्या व आपले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) दाखवा आणि पासची तपासणी करून, श्री संत ज्ञानेश्वर  दर्शन मंडप येथे दर्शनासाठी प्रवेश करावा. सदरची सुविधा  निशुल्क असून, यासाठी कोणत्याही प्रकारची मंदिर समिती फी आकारणार नाही. तसेच पंढरपूर शहर व परिसरातील महा-ई सेवा केंद्र येथे व मंदिर समिती मार्फत देखील लवकरच बुकींग केंद्र स्थापन करून भाविकांना बुकींगची सोय उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न आहे.

  तसेच सदर संकेतस्थळावर  मंदिराची माहिती, देणगी, पुजा बुकींग, भक्तनिवास बुकींग व दर्शनपास बुकींगची सोय देखील उपलब्ध आहे. या ऑनलाईन सुविधांचा भाविकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या व मंदिर समितीच्या 02186 224466 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन