राहुरीच्या पोलिस पथकाचा गौरव
लैंगिक अत्याचारापासून मुलींची सुटका करून सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान खुनाचा गुन्हा
उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच तपासी पथकाचा
पथकाचा स्नेहालयाकडून गौरव करण्यात आला
चार अल्पवयीन पीडीतांवर लैंगिक अत्याचार करून तीन पीडित मुलींना डांबून ठेवल्या बाबतची माहिती स्नेहालयाच्या पूजा दहातोंडे यांच्या कडून राहुरी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ पथक नेमून सदर माहितीची शहानिशा करणे कामी दवणगाव तालुका राहुरी येथे गेले असता सदर ठिकाणी तीन अल्पवयीन पीडीता मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी बजरंग कारभारी साळुंके, शितल बजरंग साळुंके दोघे राहणार दवणगाव यांना अटक करण्यात आली होती अटकेदरम्यान गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर याच्याबाबत आरोपीकडे तपास करतात त्याचा आरोपी बजरंग कारभारी साळुंके व त्याच्या पत्नीने खून करून त्याचे प्रेत पुरून ठेवल्याचे उघड झाले. पोलीस पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उडान प्रकल्प संचलित स्नेहालय अहिल्यानगर येथील हनीफ शेख, अँड.बागेश्री जरंडीकर मानक, प्रवीण शाम कदम, शाहिद शेख, पूजा दहातोंडे, विनायक महाले यांनी राहुरी पोलीस स्टेशन च्या पोलिस पथकाचा प्रयागाताई लोंढे , शारदा ब्राह्मणे, आशा आढाव यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर साहेब यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान केला.
Comments
Post a Comment