राहुरीत धनुष्यबाणाचा नेम हुकला कमळ आयात
घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे
राहुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकी साठी उमेदवारी नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेत
शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वर मासरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद ठरविल्याने
राहुरी धन्युष बाणाचा नेम चुकला तर भाजपाने येथे उमेदवार आयात केल्याने राज्यात व केंद्रात सत्ता असणारे पक्षाची नियोजन अभावी कशी त्रेधातिरपीट होते हे राहुरीकरांना पाहायला मिळाली
राहुरी खरी लढत जनसेवा मंडळ व भाजपात होणार असून येथे नगराध्यक्ष पदा करीता अनुसूचित जमाती करता राखीव असल्याने
येथे भाऊ अथवा दादा ची डाळ शिजली नाही
तेव्हा सुनिल मारतील का भाऊसाहेबाला थाप यांची चर्चा रंगली आहे सुनिल पवार हे या आगोदर येथे नगसेवक म्हणून निवडुन गेले होते रावसाहेब (चाचा)तनपुरे यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ते राहुरीकरांना परिचीत होते मात्र संध्या चाचा जनसेवा मंडळा बरोबर आहेत
असे असताना सुनिल पवार यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हातात घेतले येथे कमळाला धनुष्यबाण टोचेल असे वाटत असताना लढती आगोदर धनुष्यबाण निखळुन पडला तेव्हा राहुरीत पवार कमळ फुलवतील
जनसेवा मंडळाने भाऊसाहेब मोरे यांना उमेदवार दिली ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तसे भाऊसाहेब मोरे हे नवखे व राजकीय गंध नसलेले उमेदवार असले तरी तनपुरे यांचा त्यांना पाठिबा आहे तर पुढे विधान संभा पोट निवडणूक तेव्हा राहुरी आपले वर्चस्व सिद्ध करावे लागेल
नगराध्यक्ष पदा करीता 11 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र मंजुर करण्यात आले असून 12 प्रभागातून 147 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अधिकृत रित्या मंजुर करण्यात आले असून गेले अनेक वर्ष येथे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची सत्ता असून तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचे चिरंजीव हर्ष हे देखील नगसेवक पदा करीता आपले नशीब आजमावत आहेत तर माजी विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे यांच्या पत्नी सई देखील नगसेविका होण्यास उत्सुक आहेत
तेव्हा राहुरीतील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे मानाच पान कुणाला कुणाला भारी पडणार अण सत्तेची सिक्वेन्स कुणाची जुळवून येणार हे निकाला नंतर समजेल तो पर्यंत......
Comments
Post a Comment