पंजाला आशेचा करण..कमळ श्री...धनुष्याची कोंदण टोचणार कुणाला..!

श्रीरामपूरात पंज्याचा करण...कमळ श्री... धनुष्यबाणाच कोंदण कुणाला टोचणार...!
घाडगे न्यूज 
फेरफटका @शिवाजी घाडगे 
जेव्हा भले भले सत्ता उपभोगुण पंजावर लढायला तयार नाहीत अशा परिस्थितीत श्रीरामपूरात करण ससाणे यांनी पंजावर निवडणूक लढत असून हम किसीसे कम नही म्हणत प्रकाश चित्ते धनुष्यबाण हाती घेऊन परक्रिय  हस्तक्षेप रोखु पाहतात तर भाजपा गावा गावात पुड्या बाधित बाधित आपणच वाढविला अभि नही तो कभी नही म्हणत श्रीनिवास बिहाणी डिसलरिच्या पाण्यावर कमळाला फुलवु पाहत आहेत .
तेव्हा निवडणूक रंगात छत्रपतीचा गजर झाला पंजाचा करण कमळ श्री बरोबर धनुष्यबाणाचे कोंदण कोणाला कोणाला टोचणार. 

श्रीरामपूर नगर पालिका  नगराध्यक्ष पद सर्वसाधारण जागेसाठी खुले असून येथे नगराध्यक्ष पदा करीता 9 उमेदवार  लोकशाही बळकट करिन्या करीता उभे असून  34 नगसेवक प्रभागातून निवडून द्यायचे आहेत 148 उमेदवार उभे आहेत 
काॅगेस, भाजपा, शिवसेना शिंदे अशी तिरंगी लढत होणार असली तरी अण्य पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणुक लढवत आहेत जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत कोणीच कमी नाही जो तो आप आपल्या परीने निवडुन येण्या साठी प्रयत्न करतो. 
निवडणुक पुर्वी राजकीय तापले असुन  सुरवातीला ही निवडणूक काॅगेस उमेदवार करण ससाणे यांच्या साठी एक तर्फी वाटत असताना आता निवडणुक अटी तटी वर तर पोहचलीच मात्र मुद्याची बात गुद्यावर आली आहे. 
भाजपा कडुन श्रीनिवास बिहाणी, शिवसेना शिंदे प्रकाश चित्ते यांच्या 
 कमळ व धनुष्यबाण जोर धरला तर शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एकेरी उल्लेख केला 
 काॅगेसचे  जिल्हाध्यक्ष सचिन गुजर
यांना मारहाण करण्यात आली या भाषणात गुजर यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, यांच्या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य भिषेकांस विरोध करणारे अनाजीपंत व गजनी खासदार म्हणून समाचार घेतला. 
तसे करण ससाणे यांच्या  पासुन सचिन गुजर माजी आमदार लहु कानडे यांच्या गाडीत बसले होते मात्र त्यांना गाडीतून उतरून देण्यात आले तसे गुजर हे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या कडुन येवुन माजी आमदार जयंत ससाणे यांच्या गाडीत बसले नेत्यांना कसे बोलुन खुश ठेवायचे ही कला त्याच्यात आहेच म्हणून तर ते अशोक सहकारी साखर कारखाना, शिर्डी संस्थान अशा  ठिकाणी पदाधिकारी म्हणून गेले मात्र यावेळी त्यांना लक्ष करण्यात आले सकाळी फिरायला बाहेर पडत असताना त्यांना गाडीत बसून घेऊन सचिन गुजर  धिड काढण्याचा अपहरण कर्त्याचा डाव होता अशी चर्चा आहे त्यांना मारहाण करताना आजु बाजुच्या रहिवाशांनी पाहीले व त्यांची सुटका केली आपल्याला रिव्हॉल्व्हर लावल्याचे गुजर यांनी म्हटले आहे सचिन गुजर हे संध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
निवडणूक येतात व जातात मात्र एखाद्याच्या जिवाशी खेळणे योग्य नाही व जे आज सचिन गुजर यांना योग्य धडा शिकवला यांनी आपल्या येथे किती छत्रपतींचे पुतळे बसवले आहेत येथे प्रतेकांच्या मनात शिवाजी महाराज व राष्ट्रपुरुष 
 विषयी प्रेम व आदर आहे मात्र सचिन गुजर यांचे चुकले ते त्यांनी म्हणून वावरत  असलेल्या उच्च समाज्याचे कुट कारस्थाने कथीत करुन अनाजीपंतला घोडे लावले सचिन गुजर विसरुन गेले सध्या राज्य व केंद्र त्यांच्या हातात आहे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी केंद्रीय गृह व कृषी मंत्री शरद पवार यांचे पक्ष त्यानी फोडले ते काही करु शकले नाहीत तेव्हा तुम्हाला तुडवायला त्यांना काय वाटणार कारण तुमच्या कडे  बरीच माहीती आहे ती तुमच्या कडे ठेवा आता ही सांगायची वेळ नाही 
 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे हे दिवंगत माजी आमदार व  शिर्डी संस्थाचे माजी अध्यक्ष जंयत ससाणे यांचे चिरंजीव असून थेट  जनतेतुन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत मागील वेळेस दिवंगत माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांनी करण ससाने यांच्या मातोश्री राजश्री ससाणे यांचा पराभव करून एक मराठा लाख मराठा करीत नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या मात्र या वेळेस त्या नगराध्यक्ष पदा साठी  उभ्या नाहीत अथवा माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार लहु कानडे यांच्या कुटुंबातील कोणी उमेदवार नगराध्यक्ष पदा साठी नाही कदाचित नगरसेवक पदा साठी असतील ही 
  भाजपा कडुन श्रीनिवास बिहाणी यांना नगराध्यक्ष पदा करता उमेदवारी देण्यात आली  बिहाणी मोठे उद्योजक आहेत त्यांनी प्रचार जोरात सुरु केला असून मोठी ताकद दाखवून दिली आहे काही झाले तरी ससाणे यांना सत्तेवर येऊ द्यायचे नाही असा चंग बिहाणी यांनी बाधला असून आता थांबायचे नाही म्हणत प्रतिष्ठा  पणाला लावली आहे अभि नही तो कभि नही म्हणत बिहाणी प्रचारात उतरले आहेत 
तर दुसरीकडे शिवसेना शिंदे यांच्या कडून प्रकाश चित्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रकाश चित्ते हे भाजपात होते विधानसंभा निवडणूकीत ते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे स्टार प्रचारक होते व आता ते नगराध्यक्ष पदा साठी उभे आहेत चित्ते हे  चळवळीतील नेते आहेत सत्ता नसताना भाजपाचे तळमळीने काम करणारे व आता भाजपात राम राहीला नाही भाजपा धनदांडग्या फॅचशी देऊन मुळ कार्यकर्त्याचा काटा काढत असल्याचा आरोप केला व निवडणूकीचे वातावरण तप्त करुन टाकले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे प्रकाश चित्ते साठी प्रचार सभा घेतली लाडक्या श्रीरामपूरकरांना पुन्हा आपण श्रीरामपूर जिल्हा करु यांची ग्वाही दिली 
तेव्हा हात व धनुष्यबाणा च्या मध्ये सध्या कमळ आहे श्रीरामपूरात श्रीनिवास बिहाणी यांना कमळाचा वास मिळणार की करण ससाणे यांच्या हाताला वडिलांच्या पुन्याईने बळ मिळणार अथवा धनुष्यबाण प्रखरतेने प्रकाशित होणार
 सध्या  धनुष्यबाणचा रोक पंज्या बरोबर कमळावर असून तो कोणाला घायाळ करीत आगेकूच करणार  
विद्यमान आमदार हेमंत ओगले करण ससाणे यांच्या समवेत तर माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे  प्रकाश चित्ते यांच्या समवेत आहेत माजी खासदार सदाशिव लोखंडे व माजी आमदार लहु कानडे निवडणूक प्रकियेत सक्रिय सभागी दिसत नाहीत 
 पंज्याचा आशेचा किरण करण... की कमळाचा वास श्रीनिवास यांना हे निकालांच्या प्रकाशात उमजेल अण समजेल ही 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर