मोरे गुरुजींच्या हाती छत्री...पवारांना कमळाचा पाॅवर
मोरे गुरुजीच्या हाती छत्री
फेरफटका @ शिवाजी घाडगे
राहुरी नगर पालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती करीता राखीव असून येथे विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे व भाजपाचे सुनिल मोरे शिवसेना शिंदे गुलाब बर्डे यांच्यात खरी लढत असली तरी निवडणूक नगर पालिकेची आणि तयारी विधानसंभा पोट निवडनुकीची सुरु असुन प्रचार शिगेला पोहचला आहे.
विकास आघाडी म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे त्यांनी उच्च शिक्षित भाऊसाहेब मोरे सर यांना उमेदवारी दिली असून विकास आघाडीचे निवडणूक चिन्ह छत्री आहे मोरे ज्या संस्थेत शिक्षक आहेत त्या संस्धेचे संस्थापक अध्यक्ष हे दिवंगत लालाशेट बिहाणी हे राहुरी नगर पालिकेचे नगराध्यक्ष होते त्यांनी परिवहन मंडळाने नगर पालिकेचा कर थकविला म्हणून एस टी बस जप्त केली होती आता भाऊसाहेब मोरे यांना विकास आघाडीने मोरे यांना उमेदवारी दिली आहे तस राहुरी नगर पालिकेवर तनपुरे यांचे अनेक वर्षा पासुन निर्वाद वर्चस्व असून प्राजक्त तनपुरे देखील राहुरीचे नगराध्यक्ष झाले नंतर ते आमदार झाले पुढे हिंदुत्व मुद्यावर पुन्हा दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले भाजपा कडुन आमदार झाले आता काही दिवसात कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर विधानसंभा पोटनिवडणूक होणार असल्याने तनपुरे यांना राहुरीत आपल वर्चस्व सिद्ध करण्या साठी मोरे गुरुजीच्या हातात छडी ऐवजी छत्री देणे भाग पडले.
राहुरी तालुक्यात तनपुरे विरोधात विकास मंडळ असे असायचे मात्र दिवंगत नेते रामदास धुमाळ यांच्या निधनानंतर विकास मंडळ खिळ खिळे झाले रावसाहेब चाचा तनपुरे विकास मंडळाचे अध्यक्ष असले तरी ते आज बाजार समितीचे अध्यक्ष तथा तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांच्या बरोबर आहेत रावसाहेब तनपुरे हे काॅगेस चे पदाधिकारी आहेत व सुनील पवार हे रावसाहेब तनपुरे यांचे जिवलग मित्र त्यांना विकास आघाडीकडे आपल्याला नगरसेवक पदा साठी उमेदवारी मिळणार नाही यांची चाहूल लागताच त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचे कमळ हातात घेतले आणि पुर्वी या पालिकेत नगसेवक म्हणून राहीलेले सुनील पवार यांना कमळाचा पाॅवर मिळाला तस सुनिल पवार नगरसेवक म्हणून पालिकेत यापुर्वी चांगले कामे केले असून आता नगराध्यक्ष पदा करीता निवडणूक लढवत आहेत एक चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे.
महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांना शिवसेने नगराध्यक्ष पदा साठी उमेदवारी दिली असून महाराष्ट्र केसरीचा गदा हातात घेऊन नव्या पैलवांना मार्गदर्शन करणारे गुलाब बर्डे धनुष्यबाण घेऊन मतदारा समोर आले आहेत मागील वेळी त्यांची कन्या नगसेविका होत्या ते महाराष्ट्र केसरी पैलवान असल्याने सर्वाना परिचित असून शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार आहेत
राहुरी नगर पालीकेत एकुण सात उमेदवार नगराध्यक्ष पदा करीता उभे असून प्रचार शिगेला पोहचला असून 24 नगरसेवक पदा करीता 90 जण उमेदवारी करत आहेत
काही प्रभात उमेदवारी बॅनर्स फाडले गेले असून काही काळ तणाव निर्माण झाला तर अडीच वर्षांत शासनाने नियोजन मंडळातुन
राहुरीला ढबु दिला नाही केवळ निवडणूक आला तर आजु बाजुचे लोक राहुरीत येतात तेव्हा स्थानिक पातळीवर.
आपलले मतभेद विसरून आपल्या स्थानिकांना सत्तेवर बसवा परकीय राजकीय संक्रमण थांबवा
तर दुसरीकडे नगराध्यक्ष वाड्यावच्या मस्टवर हजेरी लावावी लागेल आम्ही केंद्रात व राज्यात सत्तेच आहोत भरपूर निधी उपलब्ध करु.
प्रचार अतिम टप्प्यात आला असून विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे आपल्या छत्री खाली सत्ता एक हाती सत्ता काबीज करणार की भाजपाचे सुनिल पवार कमळाचा पाॅवर दाखवणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
Comments
Post a Comment