नाशिक प्रकरणातील अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी गुन्हे दाखल

नाशिक प्रकरणातील अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील दोन आणि बीड जिल्ह्यातील एका अशा तिघांविरुद्ध अश्लील फोटो व व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल पोलिसांनी संबंधित आरोपींवर कारवाई केली आहे. पीडित महिलांची ओळख उघड होईल अशा प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्या मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर पीडित महिलांची ओळख पटेल असे अथवा त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचे कोणतेही व्हिडिओ अथवा फोटो प्राप्त झाल्यास ते तात्काळ डिलीट करावेत आणि पुढे प्रसारित करू नयेत.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर