जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपअभियत्याच्या विरोधात लाच मागणी गुन्हा दाखल
ब्रेकिंग @घाडगे न्यूज
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता सचिन सुरेश दिनकर याला लाच मागणी प्रकरणी त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर याला सशय आल्याने त्याने लाच स्विकरली नाही मात्र लाचे मागणी केल्याने त्याच्या विरोधात गुन्हा नोदवण्यात आला आहे तक्रारदार हा ठेकेदार असून त्याने
देहरे ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीतील कामाचे बिल काढण्यासाठी दिनकर याने २ टक्के प्रमाणे १,६०० रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे.
अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, रवींद्र निमसे आणि बाबासाहेब कराड यांनी ही कारवाई केली.
Comments
Post a Comment