राहरी विधानसंभा पोटनिवडणूक बिनविरोध धूसर अब तक 36
घाडगे न्यूज। प्रतिनिधी
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून बिनविरोध निवडणुकीची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत तब्बल 36 इच्छुक उमेदवारांनी 71 नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून घेतली आहेत.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना अद्याप प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी नामनिर्देशनपत्र घेतलेले नाही. त्यामुळे अंतिम क्षणीच खरी लढत कोणामध्ये होणार, याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
इतक्या मोठ्या संख्येने इच्छुकांनी नामनिर्देशनपत्रे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात किती उमेदवार रिंगणात राहणार, हे अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतरच निश्चित होईल.
राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या अकस्मात निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने बुधवारी आपल्या उमेदवाराची घोषणा केली असली, तरी इतर पक्षांकडून कोण उमेदवार दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आगामी काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता असून राहुरीतील निवडणूक रंगतदार होणार, असे संकेत मिळत आहेत.
Comments
Post a Comment