राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकी साठी अक्षय कर्डीले यांना भाजपाची उमेदवारी

अक्षय कर्डीले भाजपाचे अधिकृत उमेदवार जाहीर
घाडगे न्यूज | प्रतिनिधी
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली असून युवा नेते अक्षय शिवाजी कर्डीले यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून पक्षाचे केंद्रीय राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी दिल्लीहून या उमेदवारीची घोषणा केली.
अक्षय कर्डीले हे दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे सुपुत्र असून, त्यांच्या उमेदवारीमुळे राहुरी मतदारसंघात भाजपाने नव्या पिढीवर विश्वास दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर कर्डीले कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता, या निर्णयाला राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कर्डीले यांना उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाची रणनीती आणि नेतृत्वाची एकजूट दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर