एकीकडे धार्मिक रध तर दुसरीकडे विधानसभेचा रथ

ब्रेकिंग | @घाडगे न्यूज
राहुरीत खंडोबा यात्रेची धामधूम; १२ बैलगाड्या ओढत भक्तांचा उत्साह, तर प्राजक्त तनपुरे यांच्या मेळाव्याकडेही लक्ष तेव्हा एकीकडे धार्मिक रथ तर दुसरीकडे विधानसभेचा रथ ओढण्याची तयारी सुरु झाली असून राहुरीत आज तोबा गर्दी पहावयास मिळत आहे 
शहराचे दैवत  खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मोठी उत्साहाची लाट उसळली असून पारंपरिक पद्धतीने भक्तांकडून १२ बैलगाड्या ओढण्याचा सोहळा पार पडत आहे. या धार्मिक परंपरेमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.  आलेले भाविक यात्रेत सहभागी झाले असल्याने राहुरीत गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दुसरीकडे राजकीय घडामोडींनाही वेग आला असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. समर्थकांना एकत्र करत आगामी विधानसभा राजकारणाच्या दृष्टीने ‘रथ’ ओढण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आज संध्याकाळपर्यंत यात्रेसह तनपुरे यांच्या  मेळाव्यास मोठी गर्दी पाहवयास मिळत आहे विशेष म्हणजे, ते आगामी निवडणूक पक्षाच्या तिकिटावर लढणार की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार, याबाबतची भूमिका आता काही तासात स्पष्ट होण्याची शक्यता असल्याने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
एकूणच, राहुरीत धार्मिक उत्सव आणि राजकीय हालचाली यांचा संगम पाहायला मिळत असून तालुक्याचे राजकारण नव्या वळणावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर